raghunath patil over evm machine scam and farmer issue sangola politics Sakal
पश्चिम महाराष्ट्र

इथे बसून चंद्रावरील यान नियंत्रित करू शकतो तर 'ईव्हीएम'चे काय ? रघुनाथदादा पाटील

इथे बसून चंद्रावरील यान नियंत्रित करू शकतो तर ईव्हीएम कुठेही बसून नियंत्रित करतील.

दत्तात्रय खंडागळे :

सांगोला : इथे बसून चंद्रावरील यान नियंत्रित करू शकतो तर ईव्हीएम कुठेही बसून नियंत्रित करतील. यासाठीच ईव्हीएम हटावची भूमिका आम्ही घेतली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी सांगोला येथील पत्रकार परिषदेत दिली.

सांगोला येथे रघुनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मागण्यांसाठी सांगोला येथे बुधवार (ता. 17) रोजी धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांची संवाद साधताना रघुनाथदादा पाटील बोलत होते.

सर्व शेतकरी संघटना एकत्रित का होत नाहीत या प्रश्नावर बोलताना रघुनाथदादा पाटील म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कधीही एकत्रित यायला तयार आहे. परंतु जे कोणी शेतकऱ्यांची वाली म्हणून घेत आहेत ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती लढतात हे महत्त्वाचे आहे.

राजू शेट्टी हे कारखानदार व राजकारण्यांशी संगणमत करून आमदार, खासदार झाले आहेत. मी कधीही आमदार, खासदार झालो असतो परंतु मला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत व त्यासाठीच आम्ही लढा देत आहोत.

मतदान घेण्यासाठी ईव्हीएम मशीन बाजूला सारून जुन्या बॅलेट पेपरवर मतदान घेतले गेले पाहिजे. यासाठी आम्ही आग्रही असून हा लढा गाव तळापासून सर्वांनी मिळून लढण्याचे आम्ही ठरवले आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब वाळके, बापू ठोकळे, अशोक शिनगारे उपस्थित होते.

शेतकरी संघटनेच्या वतीने दिले निवेदन

शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन केल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन नायब तहसीलदार यांनी स्वीकारले. शेतकरी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनामध्ये सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी ताबडतोब हटवावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली पाहिजे, ईव्हीएम मशीन हटाव, देश बचाव, दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट तात्काळ रद्द करावी, सरसकट सर्व शेतकऱ्यांची,

कामगारांची, कर्जदारांची कर्जमुक्ती व वीज बिल मुक्ती तात्काळ करावी, केंद्र व महाराष्ट्र सरकारने सर्व खात्यावरील सर्व रिक्त जागांची तात्काळ भरती करावी, सांगोला तालुक्यातील जे पक्के रस्ते झाले आहेत व होणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारे रस्त्यांचे भूसंपादन करून शेतकऱ्यांना मोबाईलला दिला जावा,

सरसकट दूध उत्पादकांना विनाअट पाच रुपये दूध अनुदान दिले जावे, शेतकरी सहकारी सूतगिरणी येथील भंगाराच्या नावाने चांगल्या मशनरी विक्री केल्याबद्दल तक्रारीची तात्काळ चौकशी करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT