rain in sangli tasgaon grapes crop damage in sangli effect on rate 
पश्चिम महाराष्ट्र

अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले ; द्राक्ष बागा कोसळून लाखोंचे नुकसान

रविंद्र माने

तासगाव (सांगली) : तासगाव तालुक्यात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदार अक्षरशः हादरले आहेत. हाता तोंडाशी आलेल्या बागा धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तासगाव पुर्व भागात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला असून सावळज, डोंगरसोनी गावात चार  द्राक्षबागा कोसळून शेतकऱ्यांचे ३० लाखांचे नुकसान झाले आहे. परिणामी दर कोसळल्याने होणारे नुकसान तर कोट्यावधीच्या घरात आहे.

काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास या तालुक्याच्या बहुतांशी भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा जोर जास्ता असल्याने आणि पावसामुळे सावळज येथील शेतकरी नितीन शिवाजी तारळेकर यांची एसएसएन जातीची सुमारे पाऊण एकर द्राक्षबाग कोसळली. यात त्यांचे अदांजे ८ ते ९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  

तसेच डोंगरसोनी (ता. तासगाव) गावातील शेतकरी रमेश ज्ञानोबा झांबरे यांची सुपरसोनाका जातीची एक एकर द्राक्षबाग कोसळून अंदाजे ८ ते १० लाखांचे नुकसान झाले आहे. याच गावातील दुसरे शेतकरी प्रकाश हंबीरराव पवार यांची माणिक चमन जातीची दीड एकर द्राक्ष बाग कोसळून जवळपास १० लाखांचे नुकसान झाले आहे. कोंडिराम तुळशीराम हंकारे यांची १ एकर माणिक चमन जातीची द्राक्षबाग कोसळून ७ लाखांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार घडल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली. अचानक हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी व्याकुळ झाले आहेत. बाग पुन्हा उभी करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र यावर्षीची उत्पन्न गेल्यात जमा आहे.
    
हे वादळी हवामान पुढील तीन दिवस रहाणार असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. सध्या एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर बागा पक्व होत असून ऐन काढणीला आलेल्या पावसाने द्राक्ष मणी क्रकिंग होण्याची शक्यता आहे. शिवाय पावसामुळे दर कोसळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने अडचणी आणखी वाढल्या आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, ऐन प्रचारादरम्यान विमानतळावरच अडकून पडले!

School Nutrition : शालेय पोषण आहारातील चॉकलेट रस्त्यावर फेकले, निकृष्टता आणि अळ्यांच्या विरोधात कारवाई

Vikramgad Assembly Constituency 2024 : पतीच्या विजयासाठी आमदार पत्नी प्रचाराच्या मैदानात,आघाडीचे ऊमेदवार सुनिल भुसारांचे पारडे जड

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

SCROLL FOR NEXT