पश्चिम महाराष्ट्र

सातारा : खासदार उदयनराजेंनी केला मानाचा मुजरा

सकाळ वृत्तसेवा

सातारा : राज्यसभेच्या सात जागांसाठी आठ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. अर्जाच्या छाननीत एक अर्ज अवैध ठरला. त्यामुळे उर्वरित सात उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून, भाजप नेते व माजी खासदार उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.त्याबाबत अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. आज (ता. 18 मार्च) अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत हाेती. आता सातारा जिल्ह्यात श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर व उदयनराजे असे तीन खासदार आहेत. 

राज्यसभेच्या सात जागांसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू हाेती. राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपच्या उमेदवारांसह एका अपक्षाचाही अर्ज दाखल होता. अर्जांची छाननीत अपक्ष उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला. त्यामुळे सातही जागा बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. आज केवळ घोषणेची औपचारिकता बाकी हाेती. त्यापुर्वीच उदयनराजेप्रेमींनी राज्यातील विविध विभागात त्यांना शुभेच्छा देणारे फलक, संदेश पाठविण्यास प्रारंभ केला हाेता. 

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उदयनराजेंना राज्यसभेवर घेऊन त्यांचे पुर्नवसन करण्याचा शब्द दिला होता. त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मध्यंतरी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले, तसेच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा समावेश होता. आता या दोघांचीही राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याचे निश्‍चित झाले.

जिल्हा परिषद सदस्य सभेतच म्हणाले...मी बाटली आणली आहे, पिऊ का ?

आज (बुधवार, ता. 18 मार्च) अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत हाेती. आज सायंकाळी उदयनराजेंची राज्यसभेवर निवड झाल्याचे प्रमाणपत्र नगरसेवक दत्ता बनकर आणि जितेंद्र खानविलकर यांनी अधिकारी वर्गाकडून स्विकारले. आता उदयनराजेंना केंद्रात मंत्रिपद मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यानिमित्ताने सातारा जिल्ह्याला तिसरा खासदार मिळाला आहे. श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासोबत आता उदयनराजेंच्या रूपाने तीन खासदार मिळणार आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी या तिघांच्या माध्यमातून केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

ब्रेकिंग : जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या क्लबवर गुन्हा दाखल

उदयनराजेंच्या मालमत्तेत घट

सातारा ः माजी खासदार व भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी चार महिन्यांपूर्वी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आणि आता राज्यसभेसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या मालमत्तेच्या किमतीत घट झाल्याचे दिसत आहे. जंगम मालमत्ता तीन लाख 46 हजार 979 रुपयांनी कमी झाली असून, स्थावर मालमत्ता दोन लाख 86 हजारांनी कमी झाली आहे. त्यांच्यावर 55 लाख 67 हजार रुपयांचे कर्ज वाढले आहे, तर त्यांच्याजवळ असलेली 25 लाखांची रोकड 8.25 लाखांवर आली आहे. 37 किलो सोने 30 किलोवर आले आहे. 

उदयनराजे भोसले यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 13 कोटी 53 लाख 33 हजार 215 रुपयांची जंगम मालमत्ता असून, एक कोटी 10 लाख 23 हजार 075 रुपयांची स्वतः खरेदी केलेली स्थावर मालमत्ता आहे. यामध्ये स्वसंपादित मालमत्ता 22 कोटी चार लाख 81 हजार रुपयांची असून, वारसाप्राप्त मालमत्ता एक अब्ज 35 कोटी 20 लाख 32 हजार 190 रुपयांची आहे. त्यांच्यावर एक कोटी 81 लाख 55 हजार 222 रुपयांचे दोन वित्त संस्थांचे कर्ज आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांच्यावर 35 लाख 69 हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज होते. त्यामध्ये 55 लाख 67 हजार रुपयांनी वाढ झाल्याचे दिसत आहे. याला कारण त्यांनी दोन मर्सिडिझ बेन्ज गाड्या खरेदी केल्या आहेत.
 
चार महिन्यांपूर्वी त्यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आणि या वेळी राज्यसभेसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची जंगम मालमत्ता तीन लाख 46 हजार 979 रुपयांनी कमी झाली आहे. स्थावर मालमत्ता दोन लाख 86 हजार रुपयांनी कमी झाली आहे. शेतजमिनीची किंमत 18 कोटी 84 लाख 59 हजार रुपयांनी कमी झाली आहे. 

उदयनराजेंकडे दीड कोटी रुपयांच्या अलिशान गाड्या आहेत. यामध्ये दोन मर्सिडिझ बेन्ज, इंडीवर, ऑडी आणि मारुती जिप्सी या गाड्यांचा समावेश आहे. पत्नी दमयंतीराजे यांच्याकडे चार लाखांची पोलो कार आहे, तसेच त्यांच्याकडे 30 किलो सोने असून, त्यांची किंमत एक कोटी 80 लाख 53 हजार 317 रुपये होते. त्यांच्याकडील सोने मागील वेळेपेक्षा सात किलोंनी कमी झाले आहे. मागील प्रतिज्ञापत्रात 37 किलो सोने असल्याचे नमूद केले होते. पत्नीकडे 39 लाख 46 हजार 985 रुपयांचे दागिने आहेत. मुलगी नयनताराराजे यांच्याकडे तीन लाखांचे दागिने आहेत. उदयनराजेंकडे असलेली एक अब्ज रुपयांची जमीन ही सातारा शहर, धनगरवाडी, सोनगाव तर्फ सातारा, पेट्री, कोडोली, नवीलोटेवाडी (ता. सांगोला), सोलापूर येथील शेतजमिनीचा समावेश आहे.

साताऱ्यात बिगरशेती तीन लाख 60 हजार 593 चौरस फूट जमीन असून, तिची किंमत 18 कोटी 31 लाख 09 हजार 997 रुपये आहे, तसेच वाणिज्य इमारती 26 लाख 37 हजार रुपयांच्या आहेत. निवासी इमारतींमध्ये रविवार पेठ सातारा, कोरेगाव पार्क पुणे, कल्याणीनगर पुणे येथे सहा हजार 877 चौरस फुटांचे बंगलो आहेत. त्यांची किंमत 22 कोटी 31 लाख 92 हजार 669 रुपये होते. त्यांच्यावर एकूण एक कोटी 81 लाखांचे कर्ज असून, यामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे व्यक्तिगत कर्ज 66 लाख 12 हजार 314 रुपये, तर डायमेलर फायनान्सियल सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडचे 59 लाख 60 हजार 579 रुपये आहे. उदयनराजेंनी उत्पन्नाचा स्त्रोत शेती, व्याजाचे उत्पन्न, पगार व इतर असे दाखविले आहे. उदयनराजेंकडे आठ लाख 25 हजारांची, तर पत्नी दमयंतीराजे यांच्याकडे एक लाख 85 हजार रुपयांची रोकड असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 


विविध बॅंकांमध्ये ठेवी 

बॅंक ऑफ महाराष्ट्र, जनता बॅंक, कराड अर्बन बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ठेवी असून, एकूण 81 लाख 21 हजार 293 रुपयांच्या ठेवी आहेत. चार महिन्यांपूर्वी त्यांच्या विविध बॅंकांत 71 लाख 84 हजार 963 रुपयांच्या ठेवी होत्या. यामध्ये चार महिन्यांत नऊ लाख 36 हजार 330 रुपयांनी वाढ झाली आहे. शेअर्स, बंधपत्रे, ऋणपत्रे, मॅच्युअल फंडात एकूण 57 लाख 83 हजार 469 रुपयांची गुंतवणूक आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांची गुंतवणूक एक कोटी 24 लाख 28 हजार 589 रुपये होती. त्यांची गुंतवणूक 66 लाख 45 हजार 120 रुपयांनी कमी झाली आहे.

आपण शासकीय कर्मचारी आहात मालक नव्हे; भाजप नगराध्यक्षांचे 'त्यांना' प्रत्युत्तर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सहलीसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, आई-वडिलांसह मुलगा-मुलगी अपघातात जागीच ठार; गाय आडवी आली अन्..

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

Donald Trump : रशिया-युक्रेन युद्ध थांबवू... डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही; मृतांबद्दल दुःख व्यक्त

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ‘काम करणारा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा झाली यशस्वी

Baba siddiqui Murder case: बिश्नोईच्या हिट लिस्टवर कॉमेडिन मुन्नवर फारुकी अन् श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT