Albino Snake
Albino Snake  esakal
पश्चिम महाराष्ट्र

Albino Snake : सांगलीत सापडलेल्या 'अल्बिनो तस्कर' सापाच्या पिल्लाची सुटका; काय आहे दुर्मिळ सापाची खासियत?

सकाळ डिजिटल टीम

सांगलीत सापडलेल्या ‘अल्बिनो’ सापामध्ये रंगद्रव्ये कमी प्रमाणात असली तरी ती फिकट स्वरुपात स्पष्ट दिसून येतात. हा प्रकार अन्य वन्य प्राण्यांमध्येही आढळतो.

सांगली : येथील महावीर उद्यानात (बापट मळा) तस्कर जातीच्या बिनविषारी सापाचे ‘अल्बिनो’ (Albino Snake) पिल्लू लोकांच्या नजरेस पडले. ते दिसायला वेगळे होते आणि ते विषारी असावे, असे समजून त्याला मारून टाकण्याची कुजबुज लोकांमध्ये सुरू झाली. पण, तिथे फिरायला आलेले मिरजेचे विघ्नेश यादव यांनी लोकांना तसे करण्यापासून परावृत्त केले आणि त्याला काठीने प्लास्टिकच्या पिशवीत ढकलून बंदिस्त केले.

नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीचे वन्यजीव संरक्षक गौरव हर्षद यांनी ताब्यात घेत वनखात्याच्या (Forest Department) मदतीने त्याची निसर्गात सुखरूप सुटका केली. अनेक वन्यप्राणी रंगद्रव्याच्या कमरतेमुळे असे जन्मतः दिसतात. सांगलीत असे हा साप खूप कमी वेळा यापूर्वी दिसले आहेत. याबाबत निसर्गप्रेमी हर्षद दिवेकर म्हणाले, ‘‘साधारण तस्कर (कॉमन ट्रीकेट स्नेक) आपण पाहतो. ते चॉकलेटी काळसर वर्णाचे असतात. हा साप तोच असला तरी जनुकीय बदलांमुळे तो वेगळा दिसतो.

ज्या प्राण्यांच्या शरीराचा रंग हा रंगद्रव्याच्या अभावी फिकट किंवा पांढरट असतो, त्यांना ‘अल्बिनो’ असे संबोधले जाते. लॅटिन भाषेत ‘अल्बस’ या शब्दाचा अर्थ ‘पांढरा’ असा होतो. त्यावरून हा शब्द आला आहे. परंतु या प्राण्यांमध्ये रंगद्रव्याचा पूर्ण अभाव नसून फक्त कमतरता असते. त्यामुळे ते पांढरेशुभ्र न दिसता त्या प्राण्याच्या मूळ रंगापेक्षा फिकट रंगाचे असतात. काही जनुकीय बदलांमुळे त्यांच्या शरीरात जन्मतःच रंगद्रव्यांची कमतरता असते.

यातील बऱ्याच प्राण्यांचे डोळे लाल किंवा गुलाबी रंगाचे असतात. पण सर्वांच्याच बाबतीत असे घडतेच, असे नाही. दुर्दैवाने असे प्राणी निसर्गात फार काळ जगत नाहीत. कारण त्यांच्या फिकट रंगामुळे त्यांचे परभक्षी शत्रू आणि त्यांचे भक्ष्य असलेले प्राणी या दोघांनाही त्यांचा पटकन सुगावा लागतो. प्राण्यांच्या शरीरातील रंगद्रव्य हे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्यांच्या अंतर्गत अवयवांचे संरक्षण करत असते. पण ‘अल्बिनो’ प्राण्यांमध्ये हे घडत नाही.

वेगवेगळ्या रंगद्रव्यांमुळे त्यांची त्वचा, केस, नखे, खवले आदींना वेगवेगळे रंग प्राप्त होतात. सस्तन प्राणी आणि पक्षी यांच्यामध्ये मुख्यतः ‘मेलॅनोसाईटस्’ नावाच्या पेशी ‘मेलॅनीन’ नावाचे रंगद्रव्य निर्माण करतात. मासे, साप व मगरींसारखे सरपटणारे प्राणी, बेडकासारखे उभयचर प्राणी यांच्यामध्ये ‘क्रोमॅटोफोर’ नावाच्या पेशी विविध रंगद्रव्ये निर्माण करतात. सापांच्या शरीराचा रंग हा मुख्यतः लाल रंगाचे एरीथ्रीन आणि पिवळ्या रंगाचे झॅन्थीन या दोन रंगद्रव्यांमुळे निर्माण होतो.’’

सांगलीत सापडलेल्या ‘अल्बिनो’ सापामध्ये रंगद्रव्ये कमी प्रमाणात असली तरी ती फिकट स्वरुपात स्पष्ट दिसून येतात. हा प्रकार अन्य वन्य प्राण्यांमध्येही आढळतो. हाच नव्हे तर कोणताही साप नजरेस पडला तर घाबरून न जाता किंवा त्याला न मारता साप पकडणाऱ्या अनुभवी बचावकर्त्यांना बोलावून त्याला पकडावे आणि त्याची माहिती स्थानिक वनविभागाला द्यावी.

-हर्षद दिवेकर, नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: 'तुतारी' आता वाजतच राहणार! निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शरद पवार यांना मोठा दिलासा

Worli Hit And Run Case: वरळी 'हिट अँड रन' प्रकरणी राजेश शाहा यांना जामीन मंजूर; पोलिसांना कोर्टाचा झटका

Worli Hit And Run Case: 'अपघात झाल्याचं समजलं तरीही अंगावर घातली गाडी अन्...'; वरळी हिट अँड रन प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

Video : "त्याला बाहेर काढा !" ; 'त्या' घटनेनंतर विशाल पांडेंच्या आई-वडिलांची बिग बॉसला विनंती

Maharashtra Live News Updates : चांदणी चौक ते हिंजवडी दरम्यान मेट्रोची आवश्‍यकता - मुरलीधर मोहोळ

SCROLL FOR NEXT