Ratnagiri-Sindhudur Lok Sabha 2024 Esakal
पश्चिम महाराष्ट्र

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग महायुतीसाठी लढाई कठीण; जागेचा तिढा कायम, ठाकरे शिवसेनेसाठी ठरणार डोकेदुखी

Ratnagiri-Sindhudur Lok Sabha 2024: ठाकरे गटाकडे विनायक राऊत यांच्या रूपाने दांडगा जनसंपर्क असलेला खासदार व उमेदवार आणि या पक्षाला मिळत असलेल्या सहानुभूतीमुळे महायुतीसाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघाची लढाई सोपी असणार नाही.

सकाळ वृत्तसेवा

Yavatmal-Washim Lok Sabha 2024: शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाकडे विनायक राऊत यांच्या रूपाने दांडगा जनसंपर्क असलेला खासदार व उमेदवार आणि या पक्षाला मिळत असलेल्या सहानुभूतीमुळे महायुतीसाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघाची लढाई सोपी असणार नाही. यातच शिवसेनेच्या शिंदे गटानेही उमेदवारी मागितल्याने महायुतीचा उमेदवार निश्‍चित झालेला नाही. भाजप येथून कमळ चिन्हावरच निवडणूक लढण्यावर ठाम आहे. यामुळे भाजप या पूर्ण मतदारसंघावर प्रभाव टाकू शकणार्‍या उमेदवाराच्या शोधात आहे. मात्र महायुतीकडून ही जागा नेमकी कुणाला सुटते त्यावर बरेच कांही अवलंबून आहे.

२०१९ चे चित्र

विनायक राऊत (शिवसेना) विजयी मते : ४,५४,०२२

डॉ. नीलेश राणे (स्वाभिमानी पक्ष) मते : २,७९,७००

नवीनचंद्र बांदिवडेकर, (काँग्रेस) मते : ६३,२९९

मारुती जोशी (वंचित आघाडी) मते : ३०,८८२

विजयी उमेदवाराचे मताधिक्य : १,७४,३२२

वर्चस्व

२००४ : शिवसेना

२००९ : काँग्रेस

२०१४ : शिवसेना

२०१९ : शिवसेना

सद्य:स्थिती

चिपळूण ते दोडामार्ग अशा लांबलचक मतदारसंघात प्रभाव टाकू शकणार्‍या उमेदवाराचा भाजपकडून शोध सुरू

शिवसेनेच्या ठाकरे गटाला सहानुभूतीचा फायदा मिळण्याची भाजपला धास्ती

भाजपची वाढलेली संघटनात्मक ताकद ठाकरे शिवसेनेसाठी डोकेदुखी

भाजपकडे यावेळी नारायण राणे, दीपक केसरकर, उदय सामंत अशा दिग्गज नेत्यांचे अतिरिक्त बळ

हे मुद्दे प्रभावी ठरणार

रोजगाराचा प्रश्न गंभी‍र

पर्यावरण संवर्धनाचा प्रश्‍न

रिफायनरी समर्थन आणि विरोध

महागाई ठरणार कळीचा मुद्दा

मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था

यांत्रिकीकरणामुळे स्थानिक मच्छिमारांच्या अडचणी वाढणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : मनसे पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT