Sahyadri Tiger Reserve esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sahyadri Tiger Reserve : वन परिक्षेत्र पुनर्रचनेचा 'या' गावांना बसणार मोठा फटका; जाणून घ्या कारण

ढेबेवाडी येथून चांदोली अथवा आंबा येथून उखळू एवढ्या लांब वनक्षेत्रावर नियंत्रण ठेवणे अवघड बाब आहे.

सकाळ डिजिटल टीम

ती गावे पुन्हा चांदोली कार्यालयाशी जोडावीत, अथवा त्यांना पूर्वीप्रमाणे प्रादेशिक विभागाकडे जोडावे, अशी मागणी होत आहे.

शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील (Sahyadri Tiger Reserve) चांदोली राष्ट्रीय उद्यान (Chandoli National Park) व कोयना अभयारण्य (Koyna Sanctuary) या दोन विभागांतील वन परिक्षेत्राची पुनर्रचनेनुसार चांदोली कार्यालयांतर्गत येणारी वेत्ती, टाकळे, झोळंबी, नांदोली, खुंदलापूर आणि मणदूर ही सहा गावे आता ढेबेवाडी रेंजकडे वर्ग केली आहेत.

तर शाहूवाडी तालुक्यातील उदगिरी, उखळू गावे आंबा या नवीन तयार केलेल्या रेंजकडे वर्ग केली आहेत. त्यामुळे या गावांबाबत पुनर्रचनेचा तिढा निर्माण झाला आहे. या गावांच्या पुनर्रचनेमुळे शासकीय कामासाठी मणदूर परिसरातील रहिवाशांना वारणावती येथील १ किलोमीटरऐवजी १०० ते २०० किलोमीटर, तर उखळू परिसरातील लोकांना वारणावती येथील पाच ऐवजी आंबा येथे १२० किलोमीटर अंतर प्रवास करावा लागणार आहे.

वारणावती येथे चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे कार्यालय आहे. सध्या त्या कार्यालयाचे या परिसरातील व शाहूवाडी तालुक्यातील जवळच्या गावांवर नियंत्रण आहे. जवळ कार्यालय असल्याने लोकांना त्यांच्या अडचणींचे व समस्यांचे निराकरण करण्यास सोयीचे होत आहे. परंतु नव्या पुनर्रचनेमुळे मतदारसंघातील मणदूर व खुंदलापूर या गावांतील व अन्य वाड्यावस्त्यांवरील रहिवाशांना कऱ्हाड तालुक्यातील ढेबेवाडी येथील कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागणार आहेत.

यासाठी त्यांच्यावर मणदूर-शेडगेवाडी-कऱ्हाड-ढेबेवाडी असा येणे-जाणे २०० किलोमीटर प्रवास करण्याची वेळ येणार आहे. डोंगरकपारीतून जवळचा मार्ग हा मणदूर- आरळा- बेरडेवाडी- बांबरवाडी -मस्करवाडी- काळगाव -धामणी -कुटरेमार्गे ढेबेवाडी असून दुसरा मणदूर-आरळा -येसलेवाडी - गुढे-पाचगणी -बुरबुशी -काळगाव -धामणी -कुटरेमार्गे ढेबेवाडी हा जवळपास येणे-जाणे १०० किलोमीटर प्रवास करावा लागणार आहे.

मणदूर-कऱ्हाड मार्गावर एस.टी.ची सोय आहे. मात्र, बांबरवाडी व पाचगणीमार्गे जाण्यासाठी दुचाकीशिवाय पर्याय नाही. उखळू ग्रामस्थांना दुचाकी असेल तर उखळू-शित्तूर- तुरुकवाडी -अमेनी मार्गे मलकापूर -आंबा असा अथवा एस.टी.ने प्रवास करावयाचा असेल तर उखळू -मणदूर- शेडगेवाडी- कोकरूड- तुरुकवाडी -अमेनीमार्गे -मलकापूर -आंबा असा जवळपास १२० किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. प्रत्येकाकडे स्वतःचे वाहन आहेच, असे नाही. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना विनाकारण लांबपल्ल्याच्या प्रवासाचा मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

वणवे कोण विझविणार?

चांदोली उद्यानात वणवे लागण्याचे प्रमाण अधिक आहे. येथे कार्यालय नजीक असताना आग आटोक्यात आणणे शक्य होत नाही. मग येथे ढेबेवाडी अथवा आंबा येथून नियंत्रण कसे राहणार, हाही प्रश्न आहे. तेव्हा चांदोली कार्यालयांतर्गतची गावे आंबा व ढेबेवाडी येथे जोडण्यात आलेली आहेत. ती गावे पुन्हा चांदोली कार्यालयाशी जोडावीत, अथवा त्यांना पूर्वीप्रमाणे प्रादेशिक विभागाकडे जोडावे, अशी मागणी होत आहे.

पर्यटकांच्या सुविधांचाही प्रश्न

ढेबेवाडी येथून चांदोली अथवा आंबा येथून उखळू एवढ्या लांब वनक्षेत्रावर नियंत्रण ठेवणे अवघड बाब आहे. वारणावती येथे येणाऱ्या पर्यटकांना उद्यानात जाण्यासाठी लागणारा पासही ढेबेवाडीवरून घ्यावा लागेल किंवा येथे एखाद्या वनरक्षकाची नियुक्ती केली तरी पर्यटकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. येथील कार्यालयातून सध्या पर्यटकांना ज्याप्रमाणे सोयी-सुविधा मिळतात, त्या कार्यालय नसताना मिळणार कशा?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT