Koyna Dam Patan Satara esakal
पश्चिम महाराष्ट्र

Koyna Dam : कोयना धरणाच्या विमोचक दरवाजातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग; विद्युतनिर्मितीसाठी 1000 क्युसेकने वाढ

अत्यंत अपवादात्मक स्थितीत हा दरवाजा उघडला जातो. सध्या विद्युत निर्मितीसाठीचा २१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

टेंभू, ताकारी योजनेतून (Tembu, Takari Yojana) विसर्ग अखंड सुरू असून नदीतून पाणी उपसा वाढला आहे. सध्या नागठाणे बंधाऱ्याजवळ कृष्णा नदीतील पाणी पातळी तळाला गेली आहे.

सांगली : कृष्णा नदी (Krishna River) सातत्याने कोरडी पडत असल्याने कोयना धरणाचा (Koyna Dam) विमोचक दरवाजा उघडून त्यातून एक हजार क्युसेक अतिरिक्त विसर्ग सुरू करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने (Water Resources Department) घेतला. अत्यंत अपवादात्मक स्थितीत हा दरवाजा उघडला जातो. सध्या विद्युत निर्मितीसाठीचा २१०० क्युसेक विसर्ग सुरू असून तो आता ३१०० क्युसेक होणार आहे. त्यामुळे नागठाणे बंधाऱ्यापासून पुढे थांबलेला पाण्याचा प्रवास पुन्हा सुरू होणार आहे.

यंदा सातत्याने हा प्रयोग करावा लागण्याची शक्यता आहे. कारण, टेंभू, ताकारी योजनेतून (Tembu, Takari Yojana) विसर्ग अखंड सुरू असून नदीतून पाणी उपसा वाढला आहे. सध्या नागठाणे बंधाऱ्याजवळ कृष्णा नदीतील पाणी पातळी तळाला गेली आहे. तीच अवस्था काही दिवसांत सांगलीत होईल, अशी स्थिती होती. या पार्श्‍वभूमीवर कोयना धरणातून विसर्ग वाढवण्याबाबत सर्वच पातळ्यांवरून आग्रही भूमिका मांडण्यात आली.

खासदार संजय पाटील यांच्यासह शिवसेनेचे नेते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी अतिरिक्त पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्याचवेळी जलसंपदा विभागाने नदी कोरडी पडण्यातील सातत्य लक्षात घेता कायमचा पर्याय शोधण्याचे धोरण राबवले आहे. त्यासाठीच अपवादात्मक परिस्थितीत उघडला जाणारा विमोचक दरवाजा उघडला आहे. या दरवाजातून सोडले जाणारे पाणी थेट नदीपात्रात जाते. त्याद्वारे विद्युतनिर्मिती केली जात नाही.

...असा होतो वापर

  • कोयनेतून विद्युत निर्मितीच्या दोन केंद्रांसाठी प्रत्येकी १०५० क्युसेक विसर्ग - एकूण विसर्ग - २१००

  • कोयना-कृष्णा संगमापर्यंत वापर - ५०० ते ६०० क्युसेक

  • टेंभू बॅरेजला मिळणारा विसर्ग - १५०० क्युसेक

  • टेंभूसाठी उपसा - ९०० क्युसेक

  • ताकारीसाठी उपसा - ४०० क्युसेक

  • उर्वरित पाणी-२०० क्युसेक. त्यामुळे नागठाणे, सांगलीकडे तुटवडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT