smart card 
पश्चिम महाराष्ट्र

हे लक्षात असू द्या...1 जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड बंधनकारक

तात्या लांडगे
सोलापूर : मतदान कार्ड तथा आधार कार्ड दाखवून आपण ज्येष्ठ नागरिक असल्याची ओळख सांगणाऱ्यांना आता स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. 1 जानेवारीपासून स्मार्ट कार्ड नसल्यास ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा प्रवास बंद करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. आतापर्यंत राज्यातील 28 लाख ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केली असून आता त्याची मुदत 10 दिवस शिल्लक आहे. मात्र, तब्बल 20 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक नोंदणीपासून दूरच असल्याचे चित्र आहे.


हेही वाचाच...अरेच्चा...घरफोडीसाठी जावई यायचा सासुरवाडीला


ज्येष्ठ नागरिकांनी लालपरीतून सवलतीच्या दरात प्रवास केल्याची रक्‍कम राज्य सरकारकडून राज्य परिवहन महामंडळाला दिली जाते. त्यामध्ये भरघोस वाढ होऊ लागल्याने ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे करण्यात आले. एक खिडकी योजनेमुळे त्याचा मनस्तापही सोसावा लागला तर काहींनी नोंदणीच केली नाही. मात्र, स्मार्ट कार्डच्या नोंदणीची मुदत अवघ्या दहा दिवसांवर आली असतानाही मुदतवाढीचा निर्णय झालेला नाही. तर राज्यातील किती ज्येष्ठ नागरिक आतापर्यंत लालपरीतून प्रवास करीत होते, याची आकडेवारीच महामंडळाकडे नसल्याचे वाहतूक विभागाचे व्यवस्थापक राहूल तोरो यांनी सांगितले. परंतु, हा निर्णय राज्य सरकारकडून रद्द होईल या आशेने 20 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक स्मार्ट कार्डपासून चार हात लांबच राहिल्याचे सूत्रांनी सांगितले.


हेही वाचाच...हेही माहिती असू द्या...महापरीक्षा पोर्टलचे लेखापरीक्षण सुरु

ठळक बाबी...
  • राज्यातील 28 लाख ज्येष्ठ नागरिकांनी केली स्मार्ट कार्डसाठी नोंदणी
  • राज्य परिवहन महामंडळाकडून आतापर्यंत 40 टक्‍के स्मार्ट कार्ड वितरीत
  • 1 जानेवारीपासून स्मार्ट कार्ड असले तरच सवलतीचा प्रवास : मुदतवाढ नाहीच
  • स्मार्ट कार्ड नसल्यास द्यावे लागणार पूर्ण तिकीटाचे पैसे
  •  राज्यातील 20 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक नोंदणीपासून दूरच

हेही वाचाच...ऐकावे ते नवलच...दुचाकी चोरीसाठी तीन जिल्ह्यांचा प्रवास

स्मार्ट कार्ड नसल्यास द्यावे लागेल पूर्ण तिकीट
ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेण्यासाठी 1 जानेवारीपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक आहे. आतापर्यंत राज्यभरातील 28 लाख ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यांना वेळेत स्मार्ट कार्ड मिळावे असे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, स्मार्ट कार्ड नसल्यास संबंधितांना पूर्ण तिकीट द्यावे लागणार आहे.
- राहूल तोरो, व्यवस्थापक, वाहतूक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT