Retailers also buy in the field 
पश्चिम महाराष्ट्र

(video) किरकोळ विक्रेतेही खरेदीसाठी शेतात 

चंद्रभान झरेकर

नगर : नगर-मनमाड महामार्गावरील पिंप्री निर्मळ (ता. राहाता) येथील डॉ. शिवनाथ घोरपडे हे आपल्या शेतातील टरबूज आणि खरबुजाची थेट ग्राहकाला विक्री करीत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्यविषयक सर्व उपाययोजना करून, आवश्‍यक काळजी घेऊन, शेतावर येणाऱ्या ग्राहकांना सॅनिटाइझ करून डॉ. घोरपडे या विक्रीव्यवस्थेत यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे परिसरातील काही अधिकृत किरकोळ विक्रेतेही त्यांच्या शेतात जाऊन माल खरेदी करीत आहेत.

डॉ. घोरपडे यांनी तीन एकरांमध्ये टरबूज आणि त्याशेजारीच तीन एकरांमध्ये खरबुजाची लागवड केली होती. पंधरा-वीस दिवसांपूर्वी हा माल काढणीला आला. तो अपक्व असतानाच व्यापाऱ्यांशी करार झाला होता. मात्र लॉकडाउन झाल्याने व्यापाऱ्यांनी, सुरवातीला तयार झालेलाच माल उचलला. केवळ वीस टन टरबूज आणि दहा टन खरबूज व्यापारी लगोलग घेऊन गेले. मात्र शेतात सुमारे चाळीस टन टरबूज आणि वीस टन खरबूज अजूनही शिल्लक होते. त्यांनी मग सोशल मीडियातून जवळच्या मित्रपरिवाराला माहिती दिली आणि शेतातूनच थेट किरकोळ विक्री सुरू केली. हे करत असताना त्यांनी प्रत्येक ग्राहकाला मास्क लावणे आवश्‍यक केले.

लॉकडाउनच्या काळात प्रशासनाच्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेत, सकाळच्या वेळेतच विक्री सुरू केली. त्यातून गेल्या पंधरा दिवसांत त्यांनी सुमारे तीस टन टरबूज आणि पंधरा टन खरबुजांची विक्री केली आहे. त्यात आतापर्यंत त्यांना आठ लाखांचे उत्पन्न मिळाले. खरे तर सर्वसाधारण परिस्थितीत या सर्व मालाचे उत्पन्न किमान बारा ते चौदा लाख रुपये येणे अपेक्षित होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे नुकसान झाले. "नफा काय, नंतरही कमावता येईल.

सध्या उत्पादनखर्च तर निघालाय. सध्याच्या संकटकाळात परिसरातील ग्राहक समाधानी होत आहेत. त्यांच्या समाधानातच मी समाधान मानले तर कुठे बिघडले? हे ग्राहक माझ्याशी कायमचे जोडले जातील, हाच माझा नफा आहे!' असे डॉ. घोरपडे म्हणाले. 

आरोग्य उपकेंद्रातही स्वेच्छेने सेवा

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनच्या काळात संसर्गाच्या भीतीने बहुतांश डॉक्‍टरांनी आपापले दवाखाने बंद करणे पसंत केले असताना, डॉ. शिवनाथ घोरपडे यांनी मात्र आपला खासगी वैद्यकीय व्यवसाय काही अंशी सुरू ठेवून, गावातील ग्रामीण आरोग्य उपकेंद्रातही विनामोबदला रुग्णतपासणीचे काम केले. आरोग्य यंत्रणेला यामुळे मोठी मदत झाली. "माझ्याच गावातील रुग्ण तेथे जातात. त्यांच्यासाठी आणि सरकारी यंत्रणेला मदत व्हावी म्हणून हे काम स्वेच्छेने केले. माझे गाव निरोगी राहिले, तर त्यात माझे योगदान असेल, एवढाच विचार मी केला. डॉक्‍टर म्हणून माझे ते कर्तव्यच आहे,' असे त्यांनी सांगितले. 

ओट्यावर बसून नगावर विक्री

काही किरकोळ विक्रेते माल न्यायला येतात. त्यांना इतरांपेक्षा कमी दरात माल द्यावा लागतो. त्यांनाही पुढे नफा मिळायला हवा ना! काही महाविद्यालयीन तरुणही रोज मोठ्या प्रमाणात माल घेऊन जातात आणि आपापल्या कॉलनीत ओट्यावर बसून नगावर विक्री करतात. दुसऱ्या दिवशी मिळालेला नफा सांगताना त्यांचे खुललेले चेहरे पाहताना मोठे समाधान मिळते. 
- डॉ. शिवनाथ घोरपडे 

विक्री करताना घेतलेली काळजी 

  • ग्राहकांना मास्क लावूनच खरेदी करण्याचे बंधन. 
  • ग्राहकांनी वस्तीवर प्रवेश केल्याबरोबर, सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्यानंतरच पैसे व कलिंगड देवाण-घेवाण 
  • शेतात योग्य अंतर ठेवून ग्राहकांना कलिंगडे निवडण्याची संधी. 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT