rto-driving-license 
पश्चिम महाराष्ट्र

अवघड झाले की...इथे तीन अधिकाऱ्यांवर चालतो आरटीओचा कारभार 

तात्या लांडगे

सोलापूर : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कारभार केवळ तीन अधिकाऱ्यांवर सुरु आहे. त्यामुळे तालुकास्तरीय कॅम्पमधील वाहन परवान्याचा 195 चा कोटा आता 70 ने कमी केला आहे. आरटीओ कार्यालयातील 13 अधिकाऱ्यांना एकाचवेळी पदोन्नती मिळाल्याने अधिकाऱ्यांची संख्या घटली. आता नव्याने 18 अधिकारी मिळाले आहेत, परंतु त्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. एप्रिल-मे 2020 पर्यंत अशीच स्थिती राहणार असल्याने शेकडो वाहनचालकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. 


ऑक्‍टोबर 2019 मध्ये वाहन परवान्याचा कोटा 195 होता आणि नोव्हेंबरमध्ये तो 90 करण्यात आला. वाहनचालकांसह संभाजी ब्रिगेड व अन्य सामाजिक संस्थांनी आवाज उठविल्यानंतर तो कोटा 121 करण्यात आला. आता पुन्हा जानेवारीपासून परवान्याचा कोटा कमी करण्यात आला आहे. सध्या अपॉइंटमेंटचे बुकिंग एक महिन्यापूर्वी चालू होते. मात्र, त्याचा कोटा काही तासांतच पूर्ण झाल्याने नव्या वाहनचालकांना परवाना काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. शहर-जिल्हा वाहतूक पोलिस, महामार्ग पोलिस व आरटीओकडून वाहन परवाना नसलेल्या वाहनचालकांसह बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. दुसरीकडे परवान्यासाठी नोंदणी करुनही तो मिळत नसल्याची स्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष अमरजीत पाटील यांनी पंढरपुरातील कार्यालयातून दिला जाणारा ड्रायव्हर बॅच, डिएल विथ रिटेस्ट हे काम सुरु करावे, मुख्यालयातील विशेष कोटा ग्रामीण शिबीरासही द्यावा, कमी केलेला कोटा पूर्ववत करावा अशा मागण्या केल्या आहेत. 


ठळक बाबी... 

  • तीन कर्मचाऱ्यांवर चालतोय सोलापूर आरटीओ कार्यालयाचा कारभार 
  • दरमहा 40 लाखांच्या वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यास येताहेत अडचणी 
  • ग्रामीण पाच कॅम्पमधील वाहन परवान्याचा कोटा 70 न केला कमी 
  • 18 नवे अधिकारी प्रशिक्षणासाठी परगावी : एप्रिलनंतर कारवाई अन्‌ कॅम्प होणार सुरळीत 
  • कारवाईच्या भितीने वाहनचालकांचे तालुकास्तरीय कॅम्पमध्ये हेलपाटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT