दुर्गामाता दौड Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sagali : रायगडावरील सुवर्णसिंहासन प्रेरक ठरेल

सकाळ डिजिटल टीम

सांगली : येत्‍या दीड वर्षात स्वराज्याची राजधानी रायगडावर ३२ मण सुवर्णसिंहासन स्थापन करणार असून; ते अवघ्या जगाला प्रेरक असेल. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी शिवप्रतिष्ठानचे धारकरी घेतील. रोज दहा हजार धारकऱ्यांची फौज त्यासाठी गडावर जाईल. हे शिवकार्य लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याचा विश्वास शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी व्यक्त केला.

नवरात्रीनिमित्त सुरू असलेल्या दुर्गामाता दौडीचा बुधवारी समारोप झाला. दौडीचे यंदा ३६ वे वर्ष होते. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘तुमचं आमचं नातं काय, जय भवानी, जय शिवराय’, भारतमाता की जय, वंदे मातरम्‌ अशा घोषणांच्या ललकारीत दौडीची सांगता झाली. भगवे फेटे, पारंपरिक पोषाख, शस्त्रसज्ज पथक, महिलांचा उत्‍फूर्त सहभाग अशा वीरश्रीयुक्त वातावरणात हजारो धारकऱ्यांच्या सहभागाने सांगलीकरांचे लक्ष वेधले. मारुती चौकातील श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरुन सुरू झालेली ही दौड तब्बल चार तास चालली.

पहाटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथकाने शिवाजी महाराजांच्या मूर्तीला संचलनाने येऊन अभिवादन केले. आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, धनेश शेटे, उद्योजक प्रवीण शेट्टी यांच्या उपस्थितीत दौडीचा प्रारंभ झाला. तेथून माधवनगर रस्त्यावरील श्री दुर्गामाता मंदिरासमोर महाआरती झाली.

तेथेही संस्थापक संभाजीराव भिडे यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘जनतेने निवडून दिलेले आमदार-खासदार चुकीच्या प्रकारे वागत आहेत. पगार घेतात मात्र देश, देव आणि धर्मासाठी त्यांचे योगदान शून्य आहे. दुर्गामाता मंदिरापासून सुरू झालेली नगरप्रदक्षिणा कॉलेज कॉर्नर, कॉंग्रेस भवन, स्टेशन रस्ता, म्हसोबा चौक, खणभाग, फौजदार गल्ली, एस.टी. स्टँड, प्रशिक चौक, गावभाग, विसावा चौकातून शिवतीर्थासमोर आली. तेथे ध्येयमंत्र म्हटल्यानंतर दौडीची सांगता झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video: दलितांच्या घरात काय बनतं? राहुल गांधींनी जाणून घेतली खाद्यसंस्कृती, कोल्हापुरात स्वतः बनवलं जेवण

Raj Thackeray: "राजकारण्यांना जाळ्या नसलेल्या इमारतीवरुन उड्या मारायला लावल्या पाहिजेत"; राज ठाकरेंचा घणाघात

Stock Market Crash: चार राज्यातील विधानसभेत भाजपचा पराभव झाला तर शेअर बाजाराचे काय होणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

भारताला जिम्नॅस्टीक्सचं वेड लावणाऱ्या Dipa Karmakar ची निवृत्ती; गाजवलेलं रिओ ऑलिम्पिक

Latest Maharashtra News Updates : रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवा - पटोले

SCROLL FOR NEXT