Sambhaji Bhide addressing the crowd during the Durga Mata Run in Sangli, where he made controversial remarks about Hindu festivals. esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sambhaji Bhide: "गणपती-नवरात्र उत्सवाचा चोथा झाला, हिंदू समाजाला XXX...";  संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

Sambhaji Bhide Criticizes Modern Celebration of Ganpati and Navratri: संभाजी भिडेंच्या या विधानांनी पुन्हा एकदा समाजात चर्चा रंगली आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या असून, अनेकांनी त्यांच्या विधानांना विरोध दर्शवला आहे. त्यांचे विचार आणि भाषणांवर अनेकदा टीका केली जाते, परंतु त्यांच्या अनुयायांमध्ये मात्र त्यांना पाठिंबा मिळतो.

Sandip Kapde

सांगली: संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत. सांगली येथे आयोजित दुर्गामाता दौडी दरम्यान ते बोलत होते. गणपती आणि नवरात्र उत्सव सध्या इव्हेंट्समध्ये बदलले असून, हिंदू समाजाची दिशा बिघडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. "गणपती उत्सवाचा चोथा झाला असून, नवरात्र उत्सवात होणाऱ्या दांडियामुळे हिंदू समाजाला गोंधळात टाकले जात आहे," असे ते म्हणाले.

"नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही"

संभाजी भिडे यांनी नवरात्र उत्सवात मनोरंजनाचे कार्यक्रम होत असल्याचे निदर्शनास आणले आणि हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची गरज व्यक्त केली. "नवरात्राचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्याचबरोबर काही माता-भगिनींनी स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. "नवरात्र उत्सवात करमणुकीचे कार्यक्रम सध्या सुरू आहेत, जे उत्सवाची शुद्धता आणि परंपरा नाश करत आहेत," अशी त्यांची भूमिका होती.

"हिंदू समाज  XXX  बनवला जातोय"

भिडे यांनी आपल्या भाषणात हिंदू समाजावर गंभीर टीका केली. "शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप बनण्याचा मार्ग शिकवला, पण आज गणपती आणि नवरात्र उत्सवात आम्ही समाजाला गोंधळात टाकतोय," असे ते म्हणाले. "हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदी चिनी भाई भाई यांसारखी विचारसरणी समाजाला दिशाहीन करत आहे," अशी त्यांनी टीका केली. याचबरोबर त्यांनी पंतप्रधानांवरही निशाणा साधला, "हिंदी चिनी भाई भाई म्हणणारा पंतप्रधान हे आपल्यासाठी दुर्दैव आहे," असे ते म्हणाले.

"राजकारण आणि अर्थकारण थुंकण्याच्या लायकीचे"

भिडे यांनी राजकारण, सत्ताकारण आणि अर्थकारणावरही कडवट टीका केली. "हे सर्व शूद्र आहेत, हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत," असे त्यांनी सांगितले. त्याऐवजी शिवाजी महाराजांच्या विचारांचा अंगीकार करून समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाजी महाराजांच्या विचारांचा सन्मान राखून समाजाने प्रगती करावी, अशी त्यांनी सूचना केली.

समाजाच्या मनात संभ्रम

संभाजी भिडेंच्या या विधानांनी पुन्हा एकदा समाजात चर्चा रंगली आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या असून, अनेकांनी त्यांच्या विधानांना विरोध दर्शवला आहे. त्यांचे विचार आणि भाषणांवर अनेकदा टीका केली जाते, परंतु त्यांच्या अनुयायांमध्ये मात्र त्यांना पाठिंबा मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT