पश्चिम महाराष्ट्र

Sangali: राज्य सरकार राजकारण आणि जाहिरातबाजी करण्यात व्यस्त; राजू शेट्टींची टीका

सकाळ डिजिटल टीम

जयंत पाटील यांनी आपण एक साखर कारखानदार आहोत, हे विसरावे आणि आपण एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहोत हे लक्षात घ्यावे. राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. राज्य सरकार केवळ राजकारण आणि जाहिरातबाजी करण्यात व्यस्त आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे केला.

उसदरासंदर्भात सांगली जिल्ह्यातील कोंडी अद्याप कायम आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजारामबापू पाटील साखर कारखाना कार्यस्थळावर आंदोलन सुरू केले आहे. पोलीस प्रशासनाने कारखाना व्यवस्थापन, पदाधिकारी आणि राजू शेट्टी व स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घडवून आणली; परंतु या चर्चेत काही म्हणावा असा तोडगा निघाला नाही.

कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी सांगलीत झालेल्या बैठकीचा संदर्भ देत २०२३-२४ साठी पहिली उचल ३१०० मान्य केले असून हा अंतिम दर नसल्याचे सांगितले. यावर्षी रिकव्हरी कमी येण्याचा अंदाज असून कारखाना १०० दिवस चालेल, त्यामुळे उतारा कमीच राहील, सव्वा दहाच्या पुढे रिकव्हरी गेल्यास पन्नास रुपये ज्यादा देता येतील.

रिकव्हरी वाढली तर जास्त दर देण्याचा प्रयत्न राहील. खासगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारी कारखान्यांना दर जाहीर करताना शासनाच्या नियम अटींना अधीन राहावे लागते असे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र शेट्टी यांनी ते धुडकावून लावत तिथून गाडीतळावर मोर्चा वळवला.

जाताना शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "मागील वर्षाची एफआरपी कमी असतानाही कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी त्यापेक्षा ज्यादा पहिली उचल देण्याचे जाहीर केले आहे.

सांगली जिल्ह्यातील कारखानदार जयंत पाटील यांच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. ते राज्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, अवकाळी वर बोलत आहेत, पण इथे त्यांच्याच जवळचा शेतकरी अडचणीत आहे, याकडे दुर्लक्ष आहे. गेले महिनाभर उसाचे आंदोलन सुरू आहे, त्यावर काही बोलायला तयार नाहीत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत का नाहीत?"

ते म्हणाले, "गतवर्षीपेक्षा साखरेचे भाव वाढले आहेत, त्या पटीत उचल वाढायला हवी की नको? शेतकरी आज प्रचंड अडचणीत आहे, त्यामुळे तो दिवाळी साजरी करू शकला नाही. जयंत पाटील यांनी जाहीर केलेला ३१०० दर आम्हाला मान्य नाही. त्याला लॉजिक काय आहे? राजारामबापू कारखान्याने एफआरपी अधिक शंभर याप्रमाणे किमान ३३१० रुपये पहिली उचल जाहीर करावी यावर आम्ही ठाम आहोत.

ते ३१०० वर अडून आहेत आणि आम्ही त्यावर अधिकच्या २०० साठी ठाम आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने देऊ शकतात, हे का देऊ शकत नाहीत?" संदीप राजोबा, जिल्हाध्यक्ष महेश खराडे, पोपट मोरे, भागवत जाधव, संजय बेले, जिल्हाध्यक्ष महेश खराडे, पोपट मोरे, भागवत जाधव, आप्पासाहेब पाटील, जगन्नाथ भोसले, अँड. एस. यु. संदे, बाबासाहेब सांद्रे, शिवाजी पाटील, राम पाटील, संतोष शेळके, अनिल काळे, प्रभाकर पाटील, रविंद्र दुकाने, भुषण वाकळे, वैभव पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनाच्या सुरवातीला पोलिसांचा भव्य बंदोबस्त असूनही स्वाभिमानीचे कार्यकर्ते काटा असलेल्या बाजूने जबरदस्तीने गेटच्या आत घुसले. पोलिसांनी धरपकड करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातील काहींनी उसाच्या मोळ्या टाकल्या जाणाऱ्या गव्हाणीत उड्या मारत घोषणाबाजी केली. पोलिसांनी सर्वांना बाहेर काढले त्यानंतर कार्यकर्त्यांनी गेटवरच ठिय्या मारून घोषणाबाजी सुरू केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT