Latest Sangali News : येथील सरकारी घटावर गतवर्षीची गणेश मूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या मंडळातील दोन कार्यकर्ते आज सायंकाळी पाचच्या सुमारास सरकारी घाटाजवळ बुडाले. आदित्य अजय रजपूत (वय १६), अक्षय मनोज बनसे (वय १८) अशी त्यांची नावे आहेत. रात्री उशिरापर्यंत त्या दोघांचा शोध सुरू होता. मात्र, पाण्याचा अधिक वेग असल्याने मिळून आले नाहीत. दरम्यान, यावेळी आणखी एका तरुणास वाचवण्यात यश आले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी मंडईसमोरील वाल्मिक मित्र मंडळातर्फे प्रतिवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाची गणेशमूर्ती वर्षभर ठेवली जाते. त्यानंतर विसर्जन करून नवीन मूर्ती आणली जाते. गतवर्षाची गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सरकारी घाटावर सायंकाळी पाच वाजता आले होते. तेव्हा जवळपास चार फुटांची मूर्ती घेऊन सहाजण नदीपात्रात उतरले. धरणातून पाणी सोडल्यामुळे पातळी वाढली असून पाण्याला ओढ होती. मूर्ती पात्रात काही अंतरावर सोडून कार्यकर्ते बाहेर पडताना तिघेजण पाण्यात बुडू लागले. तेव्हा एका मच्छीमाराने धाडसाने उडी घेऊन बुडणाऱ्या
राज चव्हाण याला बाहेर काढले. तोपर्यंत आदित्य आणि अक्षय भोवऱ्यात अडकले. दोघांना पात्राबाहेर येता आले नाही. दोघेजण जागीच भोवऱ्यात अडकून बुडाले. ते बुडाल्याचे समजताच स्पेशल रेस्क्यू फोर्स, आयुष हेल्पलाईन, विश्वसेवा बोट क्लब आणि अग्निशमन दल यांनी नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला.
परंतु ते सापडले नाहीत. अंधारामुळे त्यांचे शोधकार्य थांबविण्यात आले, उद्या पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान, उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने घटनास्थळी येऊन माहिती घेतली. शिवसेनेचे महेंद्र चंडाळे यांनीही घटनास्थळी येऊन माहिती घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.