Sangli Municipal Corporation sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli : स्मृती पाटील यांची पदावरून उचलबांगडी

ऊर्मिला राजमाने यांची नियुक्ती; महापालिकेला धक्का

सकाळ वृत्तसेवा

सांगली : अवसायनातील वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी बॅँकेच्या अवसायक पदावरून महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मार्च २३ अखेर त्यांनी महापालिकेच्या बॅँकेत अडकलेल्या ठेवींपैकी किमान दोन कोटी रुपये परत करण्याची ग्वाही दिली होती.

त्यामुळे अवसायक पदावर पाटील यांना कायम ठेवावे, अशी विनंती महापालिका आयुक्तांनीही सहकार आयुक्तांना केली होती. मात्र ती धुडकावून लावत पाटील यांना या पदावरून हटवले. महापालिकेला हा मोठा धक्का आहे. स्मृती पाटील यांच्या जागी उपनिबंधक ऊर्मिला राजमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजमाने यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

मूळच्या सहकार विभागातील अधिकारी असलेल्या स्मृती पाटील यांनी महापालिकेत यापूर्वी उपायुक्त म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांची पुन्हा सहकार विभागात बदली झाली. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्याकडे वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या अवसायक पदाची जबाबदारी शासनाने दिली. पाटील यांनी पुन्हा महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येण्याचे प्रयत्न चालवले होते. त्यात त्यांना यशही आले.

मात्र विद्यमान उपायुक्त राहुल रोकडे यांनीही त्यांच्या महापालिकेतील प्रतिनियुक्तीला दोन वर्षांची मुदतवाढ मिळवण्यात मोठे यश मिळवले. त्यामुळे पाटील यांचे महापालिकेत सांगली मुख्यालयात उपायुक्त होण्याचे स्वप्न भंगले. मिरजेतील उपायुक्त पदाचा प्रभारी कार्यभार नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्याकडे देण्यात आला होता. आडके यांच्याकडील हा पदभार काढून तेथे पाटील यांना हजर करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

हे करताना पाटील यांनी महापालिका पदाधिकारी व आयुक्तांना वसंतदादा बॅँकेच्या अवसायकाचा पदभार त्यांच्याकडेच असल्याने महापालिकेच्या बॅँकेत अडकलेल्या सुमारे ४० कोटींच्या ठेवी टप्प्याटप्प्याने परत करण्यासाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाहीही दिली आहे. मार्च २३ अखेर किमान ४ ते ५ कोटी रुपये परत करण्याचा स्मृती पाटील यांनी शब्द दिला असल्याचे स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी यांनीच जाहीरपणे सांगितले.

महापालिकेला कोट्यवधींच्या ठेवी परत करताना छोट्या-मोठ्या वैयक्तिक ठेवीदारांचे काय? ज्यांच्या ठेवी दोन ते दहा लाखापर्यंत आहेत, त्यांना ५ टक्क्यांप्रमाणे १० ते ५० हजार रुपयेच मिळणार आहेत. मात्र महापालिकेला कोट्यवधी रुपये दिले जातील, हा सामान्य, वृद्ध, आजारी ठेवीदारांवर अन्याय असल्याची तक्रार सहकार आयुक्तांकडे करण्यात आली.

तसेच महापालिकेला जास्तीत जास्त ठेवी परत देता याव्यात, या हेतूनेच पाटील यांनी ५ टक्के रक्कम परत करण्याचा प्रस्ताव पाठवल्याचे सहकार विभागातील काही तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. यानंतर पाटील यांची तडकाफडकी अवसायक पदावरून उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा सहकार विभागात सुरू आहे.

आठ कोटी जमा; ८८ हजार ठेवीदार

वसंतदादा बॅँकेच्या अवसायकांनी एक लाखांपर्यंतच्या विमा कंपनीने दिलेल्या ठेवींचे १६० कोटी रुपये कर्जवसुली करून परत दिले आहेत. बॅँकेकडे आता ७ कोटी ९० लाख ५० हजार रुपये शिल्लक आहेत. ही रक्कम ठेवीदारांना ५ टक्क्यांप्रमाणे वाटप करण्याचा प्रस्ताव स्मृती पाटील यांनी दिला होता.

तो मान्य झाला असता तर महापालिकेलाच ४० कोटींपैकी दोन कोटी रुपये मिळाले असते. पण उर्वरित ८८ हजार ठेवीदारांचे काय, हा प्रश्न सहकार आयुक्तांना काही ठेवीदारांनी विचारला. यानंतर हा प्रस्ताव नामंजूर करून ५ लाखांपर्यंतच्या ठेवी परत करण्याचे आदेश सहकार आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. पण बॅँकेचे ठेवीदार ८८ हजार आहेत. त्यांच्यात ८ कोटींचे वाटप कसे करणार, हा प्रश्न नूतन अवसायकांसमोर आहे.

देणी १५९ कोटी; येणे १४७ कोटी

वसंतदादा बॅँकेत ८८ हजार ठेवीदारांना १५९ कोटींच्या ठेवी परत करायच्या आहेत. यात सांगली, पुणे, मुंबईसह ३५ शाखांतील ठेवीदारांचा समावेश आहे. बॅँकेकडे सध्या कर्ज वसुलीतील ८ कोटी रुपयेच शिल्लक आहेत आहेत. पण ठेवीदारांचे देणे १५९ कोटी रुपये आहेत. तसेच बॅँकेच्या २५०० कर्जदारांकडून १४७ कोटी रुपयांची कर्जवसुली बाकी आहे. हे केवळ मुद्दल आहे. व्याजासह हा आकडा आणखी मोठा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT