सांगली : महापालिकेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरू केलेले कोविड हॉस्पिटल बंद करण्यात आले आहे. सुमारे पाच महिन्यात या हॉस्पिटलमध्ये १०९१ कोरोना रुग्णांना सेवा देण्यात आली.
महापालिका क्षेत्रात कोरोनाची दुसरी लाट एप्रिल महिन्यात तीव्र सुरू झाली. त्यामुळे महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी मिरजेतील शासकीय तंत्रनिकेतन येथे कोवीड हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने या ठिकाणी ऑक्सिजनच्या सुविधांसह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या त्यामुळे महापालिका क्षेत्रातील रुग्णांना त्याचा लाभ घेता आला.
गतवर्षीच्या पहिल्याला त्यावेळीही महापालिकेने कोल्हापूर रोड वरील आदी सागर मंगल कार्यालयात कुबीर हॉस्पिटल सुरू केले होते तेथेही ऑक्सीजनसह विविध चाचण्याही उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यावेळीही लाट तीव्र झाल्याने तसेच महापालिका क्षेत्रात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आयुक्त कापडणीस यांनी अवघ्या सात दिवसात लोकसहभागातून आदींसागर मंगल कार्यालय येथे कोविड हॉस्पिटल सुरू केले होते. त्यावेळी सातशेहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. महापालिकेच्या या हॉस्पिटलची दखल राज्य स्तरावरही घेण्यात आली होती.
दुसऱ्या लाटेत मिरजेतील जीपीएम कोविड हॉस्पिटलमध्ये गेल्या पाच महिन्यात १०९१ रुग्णांनी सेवा घेतली आहे. ७९७ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. ३१ बाल रुग्णही महापालिकेच्या या कोविड हॉस्पिटलमधून बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांना या हॉस्पिटलमुळे जलद सेवा मिळाल्यामुळे पाच महिन्यात एकही मृत्यू झाला नाहीत. कोरोनाची दुसरी लाट कमी झाल्याने तसेच रुग्ण संख्येतही मोठी घट झाल्यामुळे महापालिकेचे हे कोविड हॉस्पिटल बंद करण्यात आले आहे.
"सध्या रुग्णसंख्या घटल्याने जीपीएमचे कोव्हिडं हॉस्पिटल बंद केले आहे. मात्र भविष्यात कोरोनाची परिस्थिती उद्भवल्यास त्याच ठिकाणी पुन्हा कोव्हिडं हॉस्पिटल सुरू करण्यात येईल. या हॉस्पिटलचा लाभ महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांना झाला. त्यांच्यावर चांगले उपचार करण्यात आले."
- आयुक्त नितीन कापडणीस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.