chairman Mansingrao Naik  esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli District Bank: जिल्हा बॅंकेकडून महिलांसाठी शून्य रक्कमेवर बचत खाती देणार

सकाळ वृत्तसेवा

सांगली, ता. ९ ः ‘‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व, म्हणजे २१६ शाखांतून महिलांची शून्य रक्कमेवर बचत खाती काढण्यात येणार आहेत,’’ अशी माहिती अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी आज दिली. त्यांनी सांगितले की, याबाबत जिल्ह्यातील सर्व शाखांना कळविण्याच्या सूचनाही अध्यक्ष श्री. नाईक यांनी दिल्या आहेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महिला खातेदार खाते काढणीपासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्यास सांगितले आहे.

अध्यक्ष श्री. नाईक म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू झाली आहे. शासनाने योजना अमलात आणताच शहरीपासून ते ग्रामीण भागापर्यंतचे सर्वपक्षीय नेते आपल्या कार्यकर्त्या बहिणीला लाभ मिळवून देण्यासाठी सरसावले आहेत. त्यासाठी बॅंकेत बचत खाते क्रमांक जोडणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जिल्हा बॅंकेने शून्य बाकीवर खाती काढून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची संपूर्ण जिल्ह्यातील सर्व म्हणजे २१६ शाखांतून तातडीने अंमलबजावणी केली जात आहे.

या योजनेसाठी काहींनी मोफत अर्ज, तर काहींनी या योजनेची माहिती सर्वसामान्य महिलांना माहितीसाठी काही उपक्रम राबवले जात आहेत. शासनाने या योजनेसाठी शेतीच्या मर्यादेसह काही जाचक अटी शिथील केल्याने गर्दी कमी झाली आहे. मात्र या योजनेसाठी शाळा सोडल्याचा दाखला ग्राह्य धरत असल्याने हा शाळा दाखला मिळवण्यासाठी शाळेमध्ये गर्दी होऊ लागली आहे.

महायुती सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाली आणि महिलांमध्ये त्याचीच चर्चा सुरू झाली. त्यासाठी जी कागदपत्रे लागणार, त्याची जमवाजमव करायला सगळ्या ‘बहिणी’ बाहेर पडल्या आहेत. या योजनेतून अडीच लाख रुपयांहून कमी एकत्रित वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिला, विधवा, परितक्त्यांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत.

‘लग्नगाठ’ योजना

जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी ५० हजार रुपये तातडीने देणार आहे. त्यासाठी केवळ लग्न पत्रिका हा पुरावा मानला जाणार आहे. त्यासाठी केवळ सहा टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. त्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Walkie-Talkies Blast: पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट! 14 ठार तर 450 जखमी, मोबाईलसुद्धा न वापरण्याचा सल्ला!

अग्रलेख : प्रतिमानिर्मितीचे प्रयोग

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT