पावसाळ्यात पाण्यात अधिक वेळ पाय असणाऱ्या लोकांना हा त्वचारोग होऊ शकतो. सततच्या ओलेपणामुळे बुरशीजन्य आजार होतात.
सांगली : महापुरातील (Sangli Flood) पाण्यात चालताना काळजी घ्यावी. जीवघेणे आजार होत नसले, तरी बुरशीजन्य रोग, ॲलर्जी, विषाणू संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच महापुराच्या पाण्यातून आल्यानंतर हात, पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत. कोरड्या कपड्याने त्वचा पुसावी, असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञांनी दिला आहे.
पावसाळ्यात (Rainy Season) किंवा महापुरात नाईलाजाने अनेकांना पाण्यात चालावे लागते. अधिक वेळ पाण्यात चालल्यास प्रामुख्याने चिखल्या हा त्वचारोग होऊ शकतो. पायाच्या किंवा हाताच्या बोटांमधील त्वचेची साल निघते. त्याठिकाणी लालसर पुरळ उठतात.
चिखल्या केवळ पायालाच नव्हे, तर हाताला देखील होतो. त्यामुळे पावसाळ्यात पाण्यात अधिक वेळ पाय असणाऱ्या लोकांना हा त्वचारोग होऊ शकतो. सततच्या ओलेपणामुळे बुरशीजन्य आजार होतात. पावसात भिजल्यानंतर ओले कपडे अंगावर तसेच ठेवल्याने गजकर्ण होण्याची शक्यता असते.
थंड हवेमुळे विषाणू संसर्ग होऊ शकतो. यात लालसर पुरळ उठणे, खाज येणे असे प्रकार घडतात. दूषित पाण्यामुळे ॲलर्जी होऊ शकते, त्वचेवर चट्टे येतात. शेतातील रासायनिक खते, कीटनाशके आदी महापुरातील पाण्यात मिसळतात. तसेच नाल्यामधील दूषित पाणी महापुरात मिसळल्याने असे आजार उद्भवू शकतात.
सांगली जिल्ह्यात नदी, नाले, ओढे १५ दिवसांपासून भरून वाहत आहेत. कृष्णा, वारणा नद्यांच्या पुराने मुक्काम ठोकल्याने गावभागातील दूषित पाणी काठावर मिसळले जाते. मात्र, अनेक ठिकाणी दूषित पाणी काठावर साचून राहिले आहे. त्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळू शकते. अशा पाण्यात उतरणे धोक्याचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.