Krishna River esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Flood : कृष्णेचे पाणी पात्राकडे परतू लागले; कोयना, वारणा धरणांतून पाण्याचा किती विसर्ग?

Krishna River : कृष्णा नदीची पाणी पातळी गेल्या ४८ तासांत संथ गतीने कमी होत अखेर ३५ फुटांपेक्षा कमी झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोयना धरणातून काल विसर्ग मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला. फक्त विद्युत निर्मितीच्या दोन दरवाजातून २१०० क्यूसेक इतका विसर्ग केला जातोय.

सांगली : कोयना, वारणा धरणांतून (Koyna, Warna Dam) पाण्याचा विसर्ग जवळपास थांबवण्यात आला आहे. फक्त विद्युत निर्मिती केंद्रातील विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असून कृष्णामाई (Krishna River) पात्राकडे सरकू लागली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत पूरपट्ट्यातील नागरी वस्त्यांतून पाणी हटेल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कृष्णा नदीची पाणी पातळी गेल्या ४८ तासांत संथ गतीने कमी होत अखेर ३५ फुटांपेक्षा कमी झाली आहे. गेल्या बारा दिवसांत चारवेळा पाणी पातळीने ४० फुटांची इशारा पातळी ओलांडली होती. पाऊस वाढला की पाणी वाढत होती आणि पावसाने उसंत घेतली की पुन्हा घट होत होती. दोन दिवसांत पाऊस थांबला. धरण भरून घेण्याची प्रक्रिया सुरू करताना विसर्ग कमी करण्यात आला.

परिणामी, कृष्णा नदीची पाणी पातळी सकाळपासून वेगाने कमी व्हायला लागली. सकाळी ६ वाजता आयर्विन पुलाजवळ पातळी ३८ फुटांवर होती. ती सायंकाळी ५ वाजता ३४ फूट ९ इंच झाली होती. कोयना धरणातून काल विसर्ग मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला. फक्त विद्युत निर्मितीच्या दोन दरवाजातून २१०० क्यूसेक इतका विसर्ग केला जातोय. तीन दिवसांत ५० हजार क्यूसेक इतका विसर्ग कमी करण्यात आला आहे.

स्वच्छता मोहीम सुरू

कृष्णा नदी पात्राकडे सरकू लागल्यानंतर पूरग्रस्तांनी आजपासून स्वच्छता मोहीम हाती घेतली. ज्या घरांतून पाणी मागे हटले आहे, ते लोक घराकडे जाऊन घराची साफसफाई करताना दिसले. पाणी पूर्ण पात्रात गेल्यानंतर आणि महापालिकेची संपूर्ण स्वच्छता मोहीम झाल्यानंतरच लोकांनी घरी परतावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT