Krishna River 
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Flood Viral Video: 'आयर्विन' पूलावरून कृष्णेत उडी; पुरातील स्टंटबाजी आली अंगलट, व्हिडिओ व्हायरल

Amit Ujagare (अमित उजागरे)

सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात जोरदार पाऊस झाल्यानंतर कोयना धरणातून पाण्याचा कृष्णा नदीत विसर्ग केला जातो. यामुळं दरवर्षी सांगलीला पुराचा फटका बसत असतो. पण याच पूरस्थितीतून नागरिकांना वाचवण्यासाठी जीवघेणी आणि थरारक परंपरा इथले तरुण अजूनही जपत असल्याचं सांगतात.

त्यानुसार, कृष्णा नदीला पूर आल्यानंतर ऐतिहासिक आयर्विन पुलावरुन नदी काठी राहणारे तरुण पाण्यात उड्या घेतात. पण हीच परंपरा जपताना म्हणा किंवा स्टंटबाजी करणं एका तरुणाच्या चांगलच अंगलट आलं. त्याला एनडीआरएफच्या टीमनं बचावलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

दोन तरुणांनी सांगलीच्या आयर्विन पुलावरुन कृष्णेच्या पात्रात उडी घेतली. त्यानंतर पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळं ते वाहून जात होते. पण नदीतील एका पोलचा त्यांनी बचावासाठी आधार घेतला. त्यानंतर नदीकाठच्या नागरिकांनी नदीच्या पाण्यात उडी घेत त्यांचा जीव वाचवला. उडी मारलेल्या तरुणाला पोहताना बराच दम लागल्यानं त्याची अक्षरशः दमछाक होत होती. त्यामुळं माणुसकीच्या नात्यानं आपण त्या तरुणांना वाचवलं अशी माहिती वाचवणाऱ्या तरुणानं दिली आहे.

परंपरा म्हणून पुराच्या पाण्यात उडी घेणाऱ्या या दोन तरुणांना नदीच्या पात्रत एक लाईटचा पोल लागला त्याला बिलगून ते राहिले. त्यानंतर दुसऱ्या तरुणांनी पाण्यात उडी घेत दोरीच्या सहाय्यानं त्यांना बाहेर काढण्यात आलं. हा बचाव कार्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

स्टंटबाजी नव्हे परंपरा

सांगलीतील कृष्णामाईच्या पात्रात पोहणं, आयर्विन पुलावरून पुरात उड्या मारणं हे नदीकाठी राहणाऱ्या तरुणांचं स्वप्न असतं. कारण जोपर्यंत कृष्णामाईच्या अथांग वाहत्या पाण्यात पोहत नाही, तोपर्यंत महापुरात लोकांचा जीव वाचविण्यासाठी सराव होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रशासन, सामाजिक कार्यकर्त्यांनी हे समजून घ्यायला हवं. पुरात उड्या मारणं, पुरात पोहणं, होड्या चालविणं, होड्यांच्या स्पर्धेत भाग घेणं ही सगळी स्टंटबाजी नसून आमची परंपरा आहे. ही परंपरा आमच्या पूर्वजांनी जपली होती.

आता नवीन पिढी म्हणून ही परंपरा जपणं आमचं कर्तव्य आहे. आम्ही ही परंपरा जपली नसती, तर 2005, 2019 आणि 2021 च्या महापुरात आम्हाला सांगलीकरांचा जीव वाचविता आला नसता, तसेच प्रशासनाला ही मदत करता आली नसती. सांगली शहरात आणि सांगलीवाडी तसेच नदीकाठच्या प्रत्येक गावामध्ये जिगरबाज तरुण आहेत. त्यामुळंच महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचा जीव वाचविता येतो. त्यामुळं सर्वांनी हे लक्षात घेऊन ही परंपरा टिकविली पाहिजे, वाढविली पाहिजे. समजा ही परंपरा संपली तर भविष्यात आपल्याला बाहेरील मदतीवर अवलंबून राहावं लागेल, अशी प्रतिक्रिया यापूर्वी सांगलीच्या रॉयल कृष्णा बोट क्लबचे ॲड. अमोल बोळाज यांनी दिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT