sangli gram panchayat election update 84 village 53 percent voting politics  Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Gram Panchayat Election : सांगली जिल्ह्यात ८४ गावांत रणसंग्राम, दुपारपर्यंत ५३ टक्के मतदान

प्रचंड चुरशीने मतदान सुरू असून अधिकाधिक मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न सुरु

सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यातील ८४ ग्रामपंचायतींसाठी रणसंग्राम सुरु असून दुपारी दीडपर्यंत ५३ टक्के मतदान झाले होते. प्रचंड चुरशीने मतदान सुरू असून अधिकाधिक मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडल्याची माहिती समोर आलेली नाही.

मिरज तालुक्यातील हरिपूर ग्रामपंचायतीत अत्यंत चुरशीची लढाई सुरु आहे. तालुक्यात ५ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून पूर्व भागात ६३ टक्के तर पश्‍चिम भागात ५३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तासगाव तालुक्यात २ गावांत निवडणूक असून ५९ टक्के, कवठेमहांकाळला १८ गावांसाठी ५२ टक्के, जतला ५ गावांसाठी ५२ टक्के,

खानापूरला ४ गावांसाठी ५२ टक्के, आटपाडीला १५ गावांसाठी ५५ टक्के, कडेगावला ३ गावांसाठी ३९ टक्के, पलूसला ४ गावांसाठी ५७ टक्के, वाळवा तालुक्यात ४ ग्रामपंचायती असून तीन ठिकाणी सरासरी ५४ टक्के तर अपर आष्टा परिसरात ५८ टक्के मतदान झाले आहे. शिराळ्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींचा रणसंग्राम सुरु असून २४ गावांत सरासरी ५३ टक्के मतदान नोंदवले गेले आहे.

या रणसंग्रामात जिल्ह्याचे सर्वाधिक लक्ष कुंडल (ता. पलूस) आणि हरिपूर (ता. मिरज) या दोन गावांकडे लागले आहे. जिल्ह्यातील हा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि विविध पक्षांचे प्रभावी गट असलेली ही गावे आहेत. तेथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.

आता शेवटच्या टप्प्यात उर्वरीत मतदान बाहेर आणण्याचे आव्हान पेलण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरु झाली आहे. सकाळी पहिल्या टप्प्यात चांगले मतदान झाले आहे. दिवाळीची धामधुम नुकतीच सुरु झाली आहे. आता दिवाळीआधी फटाके कुणाचे उडतात, याचा निकाल सोमवारी (ता. ६) लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

Latest Maharashtra News Updates : युगेंद्र पवारांच्या सांगता सभेत शरद पवारांंचं भाषण

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Winter Detox Tea: हिवाळ्यातच नाही तर बाराही महिने हे पेय तुम्ही पिऊ शकता. चरबी घटवण्यासह देते इतरही आरोग्याचे फायदे

SCROLL FOR NEXT