सुनील पवार sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली महापालिकेच्या आयुक्तपदी सुनील पवार

नितीन कापडणीस यांची नवी मुंबईला बदली

सकाळ वृत्तसेवा

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी सुनील पवार यांची आज नियुक्ती झाली. नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी नियुक्तीचे आदेश जारी केले. विद्यमान आयुक्त नितीन कापडणीस यांची नवी मुंबई येथील पालिका प्रशासन विभागाच्या उपसंचालकपदी बदली झाली. सुनील पवार हे सध्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर कार्यरत आहेत.

श्री. पवार यांनी मुख्याधिकारी पदापासून प्रशासकीय कारकिर्दीस सुरुवात केली होती. त्यांनी आष्टा, इचलकरंजी पालिकेत मुख्याधिकारी म्हणूनही काम केले होते. त्यानंतर सांगली महापालिकेत सन २०१५ ते २०१८ या कालावधीत ते उपायुक्त म्हणून कार्यरत होते. चार वर्षांनंतर पवार यांची सांगली महापालिकेत बदली झाली असून, आता ते आयुक्त म्हणून पुन्हा महापालिकेत येत आहेत.

विद्यमान आयुक्त कापडणीस यांचा तीन वर्षांचा कार्यकाल जुलैमध्ये पूर्ण झाला होता. कापडणीस यांच्या काळात शहरातील अनेक मोठ्या प्रकल्पांना गती मिळाली. काळी खण, चौक सुशोभीकरणातून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम झाले. मध्यवर्ती निदान केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना विविध चाचण्या अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आल्या. कोरोना काळात कोरोना रुग्णालय सुरू करून रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.

त्यांच्या काळात दोनदा शहराला महापुराचा फटका बसला. या काळात त्यांनी चांगले काम केले. तथापि, अनेक वादग्रस्त प्रकरणेही घडली. कोरोना काळात काही खासगी रुग्णालयांना दिलेले परवाने वादग्रस्त ठरले. त्यांच्या चौकशीची मागणी झाली. घनकचरा प्रकल्पावरून भाजप आणि अन्य सामाजिक संस्था यांच्याशी संघर्षही उद्‌भवला. कापडणीस यांची आता नगरपालिका प्रशासन विभागाच्या उपसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT