Bedag Babasaheb Ambedkar Arch Dispute esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : डाॅ. आंबेडकरांच्या नावाची कमान पाडणाऱ्या दोषींवर त्वरित कारवाई करा; बेडग ग्रामस्थांसह दलित समाज आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

कमान पाडल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. कमान नक्की कोणी पाडली, हे समजत नाही. प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत आहे.

सांगली : बेडग (ता. मिरज) येथील (Bedag Miraj) कमान पाडण्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह इतरांवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी ग्रामस्थांनी चौकशी समितीसमोर केली.

कमानीचे डिझाईन समितीला दाखवण्यात आले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने बेडग प्रकरणात आंबेडकरी चळवळीतील (Dalit Movement) कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

कमान पाडल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. कमान नक्की कोणी पाडली, हे समजत नाही. प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत आहे. कमान कोणी पाडली, हे प्रशासनाने जाहीर करावे, लवकर कमान उभी करावी. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा पुन्हा लाँग मार्च किंवा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

बांधण्यात येत असलेली कमान पाडण्यास जे अधिकारी, कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. समितीचे सदस्य आज (ता. २) बेडग येथे भेट देणार आहेत. या प्रकरणातील दोन्ही बाजूंच्या आणखी काही ग्रामस्थांशी समिती बोलणार आहे. तसेच कमानीच्या जागेची पाहणी करणार आहे.

त्यानंतर अंतिम अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे समिती सादर करणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजे, पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, गटविकास अधिकारी संध्या जगताप उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT