Sangli Police Diary Report Fraud Case esakal
पश्चिम महाराष्ट्र

Online Fraud Case : दोन महाभागांचा फंडा अन् चक्क कंपनीच्या डिलिव्हरी बॉयलाच गंडा; काय आहे नेमकं प्रकरण?

दोन महाभागांनी चक्क कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला (Delivery Boy) चुना लावण्याचा फंडा काढला.

शैलेश पेटकर

कंपन्यांकडून ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ची सुविधाही उपलब्ध केल्याने खरेदीदार वाढले आहेत. याचाच गैरफायदा कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील दोघांनी उठवला होता.

Sangli Police Diary Report : ऑनलाईन बाजारातील कंपन्या फसवणूक करतात, हे आपण ऐकले होते. मात्र दोन महाभागांनी चक्क कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला (Delivery Boy) चुना लावण्याचा फंडा काढला. अत्यंत महागडे मोबाईल (Mobile) घेऊन दारात उभ्या असलेल्या डिलिव्हरी बॉयला बोलता-बोलता चुना लावला. एकदा-दोनदा नव्हे, तीनदा... मग त्याने पोलिस ठाणे गाठले. सूत्रे फिरली, सापळा रचला गेला आणि ‘त्या’ दोघा ठगांचा पर्दाफाश झाला.

गेल्या काही वर्षांत ऑनलाईन मार्केटचे प्रस्थ वाढले आहे. काही ऑफर्स जाहीर झाल्याने मोबाईल खरेदी सर्रास ऑनलाईन केली जाते. त्यात कंपन्यांकडून ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ची सुविधाही उपलब्ध केल्याने खरेदीदार वाढले आहेत. याचाच गैरफायदा कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील दोघांनी उठवला होता. चाळीस ते पन्नास हजारांचे ब्रँडेड फोन मागवले जात होते. ही घटना फार जुनी नाही, अलीकडच्या दोनएक वर्षांतील आहे. या दोन ठगांनी मोबाईल मागवत असताना ऑनलाईन माहिती मागवली जाते; तीही त्यांनी खोटी माहिती दिली.

ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत, असाच भाग त्यांनी निवडला. पहिल्या वेळी शहरालगतच्या एका भागातून चाळीस हजारांचा फोन त्यांनी मागवला. दोन-चार दिवसांत डिलिव्हरी बॉयने फोन केला.‘सर तुमचे पार्सल आले आहे.’ त्यावेळी त्या दोघांनी घरी बोलावून घेतले. त्याच्याकडून पार्सल घेतले. त्यातील एकजण पैसे आणण्याचा बहाणा करत घरात गेला, तर दुसरा त्या डिलिव्हरी बॉयशी बोलत राहिला. हातचलाखी करत दोघांपैकी एकाने त्यातील मोबाईल काढून घेत त्यात साबणाची वडी ठेवली आणि त्या कंपनीच्या नावाने शिमगा करायला सुरवात केली. त्या डिलिव्हरी बॉयलाही समजले नाही. त्यानेही ते पार्सल रिटर्न पाठवले..

या घटनेनंतर त्या दोघांनी पुन्हा ठिकाण बदलले एका ग्रामीण भागातून पुन्हा चाळीस हजारांचा मोबाईलची ऑर्डर केली. पुन्हा एका मुलगा मोबाईल घेऊन आला. त्या वेळी असेच घडले. महिन्यात दोन वेळा विविध ठिकाणी असेच प्रकार घडल्याने कंपनी व्यवस्थापनही चक्रावले. मग, त्यांना संशय आल्याने त्यांनी डिलिव्हरी बॉयच्या मदतीने सायबर गुन्हे शाखेत तक्रार दिली. त्या वेळी सायबर गुन्हे शाखेचे तत्कालीन उपनिरीक्षक रोहिदास पवार, कॅप्टन गुंडवाडे, महादेव घेरडे, स्वप्नील नायकडी यांचे पथक तपास करू लागले.

पहिल्यांदाच अशाच प्रकारची फसवणूक झाली असल्याने पोलिसांनी शक्ती पणाला लावली. तांत्रिक तपासाची मदत घेत सारी माहिती घेतली. त्यावेळी पोलिस ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत राहिले. पोलिसांची नजर कायम होती. वातावरण शांत झाल्यानंतर संशयितांनी पुन्हा जत शहरातून एक मोबाईल मागवला. पोलिसांनी त्यातील डिलिव्हरी बॉयला पाठवले. दोघांनी पुन्हा पार्सल घेतले. ही मोडस वापरली. त्या वेळी पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तब्बल साडेसात लाखांचे १५ ब्रँडेड फोन पोलिसांनी जप्त केले. सांगली पोलिसांनी अत्यंत कौशल्याने ही तपास करत त्या दोन ठगांचा पर्दाफाश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT