Tasgaon Rain Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Rain Update : पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली; तलावांतील पाणी पातळी वाढली, पेरण्या खोळंबल्या

सकाळ वृत्तसेवा

तासगाव : तालुक्यात या वर्षी जूनमध्‍ये पडत असलेल्या पावसाने महिन्याची सरासरी ओलांडली असून, यंदा तब्बल २०१ टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. आता पर्यंत २३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सलग पडत असलेल्या पावसामुळे भारी जमिनीतील पेरण्या खोळंबू लागल्या आहेत. तालुक्यातील बहुतांश तलावातील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे.

तासगाव तालुक्यात या वर्षी पावसाने जून महिन्यातच जोरदार बॅटिंग सुरू ठेवली असून चार जूनपासून सलग सुरू असलेल्या पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे. तालुक्यात जून महिन्यात सरासरी ११४ मिलिमीटर पाऊस पडतो.

मात्र, यावर्षी २८ जूनअखेर २३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मांजर्डे मंडळात तब्बल ३५२.९ मिलिमीटर विक्रमी पाऊस पडला आहे. मणेराजुरी मंडलात २५६, विसापूर २०१, वायफळे २५६, तासगाव १७४, सावळज १०४, तर येळावी मंडलात १७५ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

४ जूनपासून सुरू असलेला पाऊस दररोज कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावताना दिसत आहे. गेल्या २० वर्षांत यंदा जून महिन्यातच विक्रमी पाऊस नोंदविला गेला आहे. तालुक्यात मेमध्‍ये शेतीसाठी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत होते.

मात्र, जूनमध्‍ये पडत असलेल्या पावसाने शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. सलग पडणाऱ्या पावसाने ग्रामीण भागात पेरण्यांची लगबग सुरू असून, उघडीप मिळताच पेरण्या उरकल्या जाताना दिसत आहेत.

अनेक ठिकाणी भारी जमिनीतील पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी घात येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तासगाव शहरात कृषी सेवा केंद्रात बियाणे आणि खतांच्या खरेदीला शेतकऱ्यांची गर्दी दिसत आहे. गेल्या काही वर्षांत प्रथमच खरीप पेरण्या वेळेवर होताना दिसत आहेत.

दरम्यान, या पावसाने ग्रामीण भागात ओढे, नाले वाहताना दिसत आहेत. बहुतांश गावतलाव भरले आहेत. सिद्धेवाडी, लोढे, अंजनी, पेड, मोराळे तलावांतील पाण्याची पातळी लक्षणीयरित्या वाढली आहे. जून महिन्यातच येरळा आणि अग्रणी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT