Sangli Water Storage Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Water Storage Update : जोरदार पावसाने वाढला पाणीसाठा; १६ वरून ३७ टक्क्यांवर, बळीराजाला दिलासा

Sangli Rain Update : मध्यम, लघु प्रकल्पात महिनाभरात पाणीसाठा १६ टक्क्यांवरून ३७ टक्क्यांवर

सकाळ वृत्तसेवा

Sangli News : यंदाच्या मोसमी पावसाने दमदार सलामी दिली, मात्र त्यानंतर महिनाभर दडी मारली, तरीही ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात मध्यम व लघुप्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात पाणीसाठा १६ वरून ३७ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

गत वर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती, मात्र यंदा जूनपाठोपाठ निम्मा जुलै कोरडा गेला आहे. परंतु दुष्काळी तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

जून महिन्यात जिल्ह्यातील मध्यम आणि लघुप्रकल्पांमध्ये १२६५ दशलक्ष घनफूट म्हणजे १६ टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर महिनाभरात हा पाणीसाठा ४११२ दशलक्ष घनफूट झाला आहे. त्यापैकी २९२० दशलक्ष घनफूट म्हणजे ३७ टक्के पाणीसाठा उपयुक्त झाला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

जूनमध्ये १७५ टक्के पाऊस

जिल्ह्यात ५ मध्यम व ७८ लघु असे ८३ प्रकल्प आहेत. त्यांची पाणी साठवण क्षमता ९४४० दशलक्ष घनफूट आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पात २३५९ दशलक्ष पाणीसाठा होता. त्यापैकी १२६५ दशलक्ष घनफूट म्हणजे १६ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा होता. जून महिन्यात सर्वसाधारण १२९ मिलिमीटर इतका पाऊस होतो.

मात्र, यंदा जून महिन्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. काही भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात ३० दिवसांपैकी १७ दिवस पाऊस झाला. या काळात २२६ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या १७५ टक्के पाऊस झाला.

१६ टक्के पाणीसाठा उपयुक्त

जूनमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघुप्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात १६ टक्के पाणीसाठा उपयुक्त होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पात एकूण पाणीसाठा ४११२ दशलक्ष घनफूट म्हणजे ३६ टक्के झाला आहे. अर्थात गत महिन्याच्या तुलनेत एकूण पाणीसाठ्यात १४५३ दशलक्ष घनफूटने वाढला आहे. या पाणीसाठ्यापैकी २९२० दशलक्ष घनफूट पाणी उपयुक्त ठरणार आहे.

दुष्काळी तालुक्यातील प्रकल्पात पाणी

जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, खानापूर आणि तासगाव तालुक्यातही चांगला पाऊस झाला असल्याने या भागातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. आठ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, ११ प्रकल्प कोरडे आहेत,

तर १० प्रकल्पांत मृत साठा आहे. ११ प्रकल्पांत ७५ टक्क्यांहून, १५ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के आणि १० प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

तालुकानिहाय पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)

तालुका -प्रकल्प संख्या- उपयुक्त पाणीसाठा -टक्के

  • तासगाव- ७.- ४०४.३१ -७२

  • खानापूर- ८ -१९६.२८- ३६

  • कडेगाव- ७. -३७३.४१ -५९

  • शिराळा -५- ३४३.५५ -३९

  • आटपाडी- १३ -७५८.५२ -६६

  • जत -२७- ५७९.४६- १९

  • कवठेमहांकाळ- ११ -१८३.६७- २२

  • मिरज -३- ७८.२० -६५

  • वाळवा -२ -३.०८ -६

  • एकूण -८३ -२९२०.४९ -३७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT