Sangli ZP sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : माजी अध्यक्ष, उपाध्यक्षांसह दिग्गजांचे पत्ते कट

जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर

सकाळ वृत्तसेवा

सांगली : सांगली जिल्हा परिषदेच्या ६८ गटांची आरक्षण सोडत आज काढण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणासह ही सोडत काढण्यात आली आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी ८, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १८, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२ गट आरक्षित झाले आहेत. यामध्ये ३४ जागा महिलांसाठी राखीव आहेत. माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि प्राजक्ता कोरे, माजी उपाध्यक्ष सुहास बाबर आणि शिवाजी डोंगरे यांच्यासह दिग्गजांचे पत्ते कट झाले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांनी आरक्षण सोडत जाहीर केली. या सोडती रितेश चित्रुक या लहान विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आल्या. गेल्या चार निवडणुकांतील आरक्षण वगळून हे आरक्षण काढण्यात आले. नव्या पुनर्रचनेनुसार जिल्हा परिषदेचे ६८ गट आहेत. २००२, २००७, २०१२ आणि २०१७ या चार निवडणुकांमधील आरक्षणाचा विचार करण्यात आला.

जिल्ह्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्या कमी असल्याने या प्रवर्गासाठी जागा आरक्षित केली नाही, तर लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार अनुसूचित जातींसाठी आठ गट निश्‍चित करण्यात आले. त्यातून महिलांच्या चार जागांसाठी सोडत काढण्यात आली. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) १८ जागा आरक्षित करण्यात आल्या. त्यातील ९ गट महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. याच पद्धतीने सर्वसाधारण ४२ गटांचे आरक्षण निश्‍चित केले. मणेराजुरी, चिंचणी, कुंडल, कुरळप, अंकलखोप, बागणी हे मतदारसंघ पुन्हा खुले झाले आहेत.

नव्या गटांचे आरक्षण

यावेळी एकूण आठ नवीन गट निर्माण झाले आहेत, तर पाच गटांची नावे बदलण्यात आली आहेत. तेथे पुढीलप्रमाणे आरक्षण आहे ः निंबवडे (नामाप्र), कवठेएकंद (नामाप्र), नांद्रे (सर्वसाधारण महिला), सांगाव (सर्वसाधारण महिला), करंजे (नामाप्र महिला), सावंतपूर (नामाप्र महिला), बहाद्दूरवाडी (अनुसूचित जाती), कुरळप (सर्वसाधारण), वाळेखिंडी (सर्वसाधारण), करजगी (नामाप्र महिला) माडग्याळ (नामाप्र महिला), हरिपूर (सर्वसाधारण महिला), नेर्ले (सर्वसाधारण).

हरकतींना २ ऑगस्टपर्यंत मुदत

आरक्षण सोडतीबाबतच्या हरकती २९ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद गटाची हरकत जिल्हाधिकारी कार्यालयात, तर पंचायत समिती गणांची हरकत तालुक्यात तहसील कार्यालयात द्यायची आहे.

...यांना संधी

माजी अध्यक्ष देवराज पाटील (कासेगाव), माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, सम्राट महाडिक (पेठ), शरद लाड (कुंडल), ब्रह्मनंद पडळकर (निंबवडे), तम्मनगौडा रवी-पाटील (जाडरबोबलाद), अमित पाटील (येळावी), विराज नाईक (मांगले), संभाजी कचरे, वैभव शिंदे (बागणी), रणधीर नाईक (पणुंब्रे तर्फ वारुण), डी. के. पाटील (चिंचणी), नितीन नवले (अंकलखोप), सतीश पवार (मणेराजुरी)

...यांचा पत्ता कट

संग्रामसिंह देशमुख, प्राजक्ता कोरे, सुहास बाबर, शिवाजी डोंगरे, काँग्रेसचे पक्षप्रतोद जितेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद अर्जुन पाटील, प्रमोद शेंडगे, सुषमा नायकवडी, जगन्नाथ माळी, आशा पाटील, अरुण राजमाने, अरुण बालटे, सुरेंद्र वाळवेकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT