नगर : महापालिकेत स्वीकृत नगरसेवकपदासाठी शनिवारी (ता. 10) झालेल्या महासभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विपुल शेटिया व बाबासाहेब गाडळकर यांची नावे सादर करण्यात आली होती. हे दोन्ही अर्ज अपात्र ठरले. स्वीकृत नगरसेवकपदासाठी सुरवातीला संजय घुले यांचे नाव निश्चित समजले जात होते. मात्र, पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलत आमदार संग्राम जगताप यांनी केवळ स्वतःच्या वॉर्डातील निकटवर्तीयांनाच स्वीकृत नगरसेवक बनविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप माजी नगरसेवक संजय घुले यांनी पत्रकाद्वारे केला आहे. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नाराजी उघड झाली आहे.
हेही वाचा- (व्हिडीओ) : फुलपाखरे आणि चंद्रावर स्वारी
शहरात घुले व कळमकर कुटुंबीय हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. ही दोन्ही कुटुंबे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीपासून शरद पवार समर्थक मानली जातात. निवेदनात म्हटले आहे, की महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीकरिता अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, शहराचे निरीक्षक अंकुश काकडे यांना दूरध्वनी केला होता. त्यांनी स्वीकृत नगरसेवकांच्या दोनपैकी एका जागेवर संजय घुले यांना घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी घुले यांचे नाव डावलले.
स्वत:च्या प्रभागालाच प्राधान्य
यापूर्वीही कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील पालकमंत्री असताना, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी (स्व.) शंकरराव घुले यांचे नाव स्वीकृत नगरसेवकपदासाठी दिले होते. त्यावेळीही ते डावलून दुसरे नाव घेतले होते. घुले नावाला त्यांचा विरोध होता, तर शहरातून एक व उपनगरातून एक नाव निश्चित करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी स्वतःच्या प्रभागातीलच दोन नावे निश्चित केली.
पवारांकडे तक्रार करणार
आपण शहराचे आमदार आहात, संपूर्ण शहरात डॉक्टर, इंजिनिअर, कॉन्ट्रॅक्टर, प्राध्यापक, अल्पसंख्याक, धनगर, मागासवर्गीय, मुस्लिम, ब्राह्मण अशा अनेक छोट्या-मोठ्या समाजाने विधानसभेला भरभरून मदत केली. त्या समाजाच्या प्रमुखांना स्वीकृत नगरसेवक करण्याचे आश्वासन दिले होते. झालेल्या सर्व घडामोडींबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून तक्रार करणार आहे, असे घुले यांनी पत्रकात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.