भ्रष्ट आचरणामुळे कोल्हापूर धर्मादाय सहआयुक्तांनी समिती रिक्त केली आहे. मात्र ही समिती काम पाहत असून त्यांच्याकडून न सांगण्यासारखे भ्रष्टाचार सुरू आहेत.
आटपाडी : आदमापूर (जि. कोल्हापूर) येथील महाराष्ट्राचे जागृत देवस्थान श्री संत बाळूमामांच्या लौकिकाला व्यवस्थापन समितीच भ्रष्ट आचरणातून धक्का लावण्याचे काम करत आहे.
भ्रष्टाचारात बरबटलेली ही समिती विसर्जित करून शासनानेच धर्मादाय कायदा आणून धनगर समाजाचे प्रतिनिधित्व असलेली नवीन समिती निर्माण करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
आदमापूर (Adampur) येथील श्री संत बाळूमामा महाराष्ट्रात जागृत देवस्थान, श्रद्धास्थान असे मानले जाते. त्याच्या दर्शनासाठी राज्य, देश आणि परदेशांतून कोट्यवधी भाविक प्रतिवर्षी येतात. तेथे मोठे धार्मिक सोहळे पार पडतात. तेथील व्यवस्थापन समितीच्या भ्रष्ट कारभाराची तक्रार आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात मांडली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या संदर्भात भेट घेतली. श्री संत बाळूमामा देवस्थानला दर्शनासाठी जगभरातून भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. हे भाविक मंदिराला मोठ्या मनाने देणगी आणि दक्षिणा देतात. सध्या या मंदिराचे व्यवस्थापन कोल्हापूर येथील धर्मादाय उपायुक्तांकडे नोंदणी असलेल्या समितीकडे आहे.
मात्र, भ्रष्ट आचरणामुळे कोल्हापूर धर्मादाय सहआयुक्तांनी समिती रिक्त केली आहे. मात्र ही समिती काम पाहत असून त्यांच्याकडून न सांगण्यासारखे भ्रष्टाचार सुरू आहेत. राज्य, देश आणि परदेशातून येणारे भाविक देणग्या आणि लाखोंची देणगी देतात. मात्र त्यांना समिती कसल्याही सुविधा देत नाही. सुविधा देणे राहिले दूरच, उलट भ्रष्टाचाराने ही समिती बरबटली आहे. मंदिराच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवर त्यांनी कब्जा मिळवला असून त्याचा गैरवापर सुरू आहे.
त्यामुळे या धार्मिक स्थळाला डाग लावण्याचे काम सुरू असून ते तत्काळ थांबवणे अत्यंत आवश्यक आहे. कोल्हापूर येथील करवीर श्री महालक्ष्मी मंदिरासंदर्भात शासनाने विशेष कायदा केला आहे. त्याच धर्तीवर श्री संत बाळूमामा देवस्थानसाठी कायदा करून नवीन व्यवस्थापन समिती (Sant Balumama Management Committee) स्थापन करावी आणि त्यामध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.