Sant Gajanan Maharaj Palkhi sohala esakal
पश्चिम महाराष्ट्र

Palkhi Sohala 2024 : मोहोळमधून संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ, तर पारगावात घुमला विठू नामाचा गजर

शेगांव येथील संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे आज सकाळी शिंगोली- तरटगावमध्ये (ता. मोहोळ) आगमन झाले.

राजकुमार शहा, सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

शिंगोली येथील बसस्थानक परिसरात उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपात श्रींची पालखी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली होती.

मोहोळ : विदर्भ पंढरी-शेगांव येथील संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे आज सकाळी शिंगोली- तरटगावमध्ये (ता. मोहोळ) आगमन झाले. भक्तीमय वातावरणात व मोठ्या उत्साहात पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले.

आषाढी एकादशीनिमित्त सावळ्या विठूच्या भेटीसाठी निघालेल्या शेगांव येथील संत गजानन महाराज पालखी सोहळा शुक्रवारी सीना तिरावरील तिऱ्हे येथे मुक्कामी होता. पहाटे साडेपाचच्या सुमारास तिऱ्हेकरांचा निरोप घेत सीना नदी पार करून या पालखी सोहळ्याने शिंगोली-तरटगाव येथे मोहोळ तालुक्यात प्रवेश केला.

समस्त तालुकावासियांच्या वतीने तहसीलदार सचिन मुळीक, गटविकास अधिकारी आनंद मिरगणे यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी, सरपंच अविनाश मोटे, उपसरपंच पांडुरंग रासेराव, मंडलाधिकारी बसवराज सालीमठ, रणजित घुणावत, सिध्देश्वर नकाते यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते. सोमनाथ दावणे यांनी स्वागतासाठी भजनी मंडळांच्या अभंगांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सकाळी सातच्या सुमारास भोजनासाठी या सोहळ्याचे कामती खुर्द येथे आगमन झाले. शेगावच्या राणाच्या स्वागतासाठी मार्गावर आकर्षक रांगोळ्या व फुलांच्या पायघड्या घालून पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. सरपंच सविता माळी, उपसरपंच दीपक काटकर सुभाष पाटील, अशोक पाटील, श्रीकांत पाटील, उदय गोडबोले, भीमराव उमाटे, विठ्ठल माळी यांच्यासह ग्रामस्थांनी श्रींच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करीत स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य छबुराव फुलसागर, राजाराम उमाटे, अजीत कांबळे, शिवानंद पाटील, महावीर तरंगे ग्रामसेविका मंजुषा कारंडे, कामती आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी चेतन आयवळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

येथील बसस्थानक परिसरात उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपात श्रींची पालखी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. यावेळी परिसरातील भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मैदानावर वारकऱ्यांसाठी भोजनाची सोय करण्यात आली होती. यानंतर हा सोहळा वाघोली मार्गे पंढरीकडे मार्गस्थ झाला. दरम्यान, पालखी मार्गावर विविध संस्था व भाविकांच्या वतीने वारकऱ्यांना चहा, फराळाचे वाटप करण्यात आले. कामती पोलिसांनी मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता.

Ashadhi Wari 2024

जिल्हा परिषद शाळेत दिंडी सोहळ्याचे आयोजन

पारगाव : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे आषाढी वारीनिमित्त विद्यार्थ्यांच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशात सहभागी झाले होते. अश्वासह रिंगण सोहळा ही रंगला होता. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. गावातील बाजारपेठेमधून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. विठ्ठल-रूखमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व इतर संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी तसेच वारकऱ्यांच्या वेशातील सहभागी झालेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या दिंडी सोहळ्याचे नियोजन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हेमंत विटकर, शिक्षक उदयकुमार लोंढे, अनिल वरे, नवनाथ धुमाळ, सावकार आरगडे, प्रतिभा शिंगाडे, गीतांजली लोंढे, सुजाता जारकड, जयश्री चव्हाण, युगंधरा गाडेकर यांनी केले होते. यावेळी सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश हिंगे, उपाध्यक्ष शुभांगी एलभर व सर्व सदस्य उपस्थित होते.

पारगावात घुमला विठूचा गजर

हाती टाळ, कपाळी गंध, मुखाने ज्ञानोबा तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी असा जयघोष करत आज शनिवारी पारगाव (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिंडी निघाली. छोटीशी सुंदर पालखी, त्यात छोटेसे विठोबा रखुमाई, आणि त्या पालखीचे भोई सुद्धा शाळेतले चिमुकले विद्यार्थी! अतिशय सुंदर असा भक्ती रसात न्हावून निघालेला सोहळा येथे रंगला होता.

Ashadhi Wari 2024

आषाढी वारीनिमित्त विद्यार्थ्यांच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिंडी गावातून प्रदक्षिणा घालून पुन्हा शाळेत आली. गावामध्ये एका चौकामध्ये रिंगण सुद्धा झाले. त्यावेळी चिमुकल्या भक्तांनी त्याचबरोबर शिक्षकांनी आणि उपस्थित पालकांनी फुगड्या खेळून आनंदोत्सवात भर घातली. गावातील पालकांनी पालखीची पूजा करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटला. या उपक्रमासाठी शाळेतील मुख्याध्यापक संतोष लबडे, शिक्षक मीना डुंबरे, स्नेहल लोखंडे,छाया गांगर्डे, वैशाली थोरात, अशोक हिंगे, संतोष चव्हाण या शिक्षकांनी बालदिंडीचे नियोजन केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेक चव्हाण, काळुराम लोखंडे, दत्तात्रय देवडे अण्णा यांनी भजन साथ दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT