'भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यानंतर कोण, हे कोणालाही सांगता येणार नाही.'
विटा : ‘‘भाजपकडे (BJP) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे व्हिजन आहे. कल्पकता आणि नवीन संकल्पनेच्या आधारे सर्वांगीण विकास साधण्याचं काम फक्त भाजपच करू शकतो. उत्कृष्ट व प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची कदर भाजपकडे आहे. समर्पित जीवन जगणाऱ्या कार्यकर्त्यांचा आपला पक्ष आहे,’’ असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केले.
ते म्हणाले, ‘‘अवघ्या ६०० मतांच्या पडळकरवाडीतील माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपने आधी राज्यसभेवर जाण्यासाठी विचारणा केली आणि नंतर विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Elections) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान व त्यांना पाठिंबा देण्यासाठी सांगलीचा खासदार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्षम राहावे.’’
भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रवासी कार्यकर्ता मेळावा आणि बूथ कमिटी मेळाव्यात आमदार पडळकर बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, प्रमोद शेंडगे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा सचिव पंकज दबडे, माजी नगरसेवक अनिल म. बाबर, तासगावचे सुनील पाटील, तालुकाध्यक्ष अॅड. प्रमोद भारते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार पडळकर म्हणाले, ‘‘भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यानंतर कोण, हे कोणालाही सांगता येणार नाही. भाजप हा सामान्य कार्यकर्त्यांना संधी देणारा मोठा पक्ष आहे. प्रशासकीय यंत्रणांचा दबाव टाकून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा विरोधक प्रयत्न करीत असतील, तर ते सहन केले जाणार नाही. सरकार आणि सत्ता आपली आहे, याची जाणीव शासकीय यंत्रणेला करून द्या. आपल्या कोणत्याही कार्यकर्त्यांचे दोन नंबरचे धंदे नाहीत, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.’’
जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्ष हा गोरगरिबांच्या हिताची जोपासना करणारा पक्ष आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन पक्षात कामाचा विचार केला जातो. त्यामुळे कामाच्या माणसाला संधी मिळतेच. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जिभेवर सरस्वती आहे. आज पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्यासाठी मागणी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात पक्षाची ताकद वाढत आहे.’’
‘‘विटा शहर आणि तालुक्यात झालेले काम कौतुकास्पद आहे. सर्व सामान्यांना नाही, हे माहीत झाले आहे, इतकी भाजपची वाटचाल दिमाखात सुरू आहे,’’ असे त्यांनी सांगितले.माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर म्हणाले, ‘‘पंकज दबडे यांच्यासह विट्यातील टीम अहोरात्र कष्ट घेऊन पक्षवाढ करीत आहे. आज पक्षात अनेक चेहरे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात येत आहेत. आम्ही तालुक्याचा दौरा केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. खानापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या सत्तेत आपण वाटेकरी आहोत. पक्षाची ताकद वाढत आहे. त्यामुळे सर्व निवडणुकांत यश मिळेल, याची खात्री आहे. वरिष्ठांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यावी.’’
विटा शहर प्रभारी पंकज दबडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सत्यजित पाटील, युवा मोर्चाचे नीलेश पाटील, संदीप ठोंबरे, दाजी पवार यांनी मनोगत व्यक्त केले. आध्यात्मिक सेलचे राज्याध्यक्ष संतोष यादव, जिल्हा उपाध्यक्ष सुहास पाटील, जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंबे, प्रमोद धायगुडे, विलास काळेबाग, रविराज पवार यांच्यासह मान्यवर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.