सर्वम मंगेश बाळेकुंद्री sakal
पश्चिम महाराष्ट्र

एक वर्षाच्या सर्वमला दुर्मिळ आजार ; 16 कोटीच्या मदतीची गरज

सतीश जाधव

बेळगाव : शहापूर लक्ष्मी रोड येथील एका तान्हुल्याचे हसू नशिबाने हिरावून घेतले आहे. त्याला स्पायनल मस्क्यूलर एट्रोपी (Spinal muscular atrophy health news) (एसएमए-१) नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. त्याच्यावर सध्या बंगळूर (Bangalore )येथील बॅपटीस हॉस्पिटल, (बळ्ळारी रोड) या ठिकाणी उपचार सुरु आहेत. मात्र, या आजारातून पुर्णपणे बरे होण्यासाठी सर्वम महेश बाळेकुंद्री (वय १ वर्षे ४ महिने) या बाळाला सुमारे १६ कोटी रुपयांच्या इंजेक्शनची गरज आहे.

सर्वमला जन्मापासूनच या आजाराने घेरले आहे. सुरुवातीचे सहा महिने त्याला कोणताही त्रास झाला नाही. मात्र, त्यानंतर त्रास होऊ लागला. त्यावेळी हात-पाय न हलविणे तसेच मानेची समस्या येऊ लागली. यासाठी बेळगाव शहरातील बहुतांशी बालरोग तज्ज्ञांकडे त्यांनी उपचार घेतले. त्यावेळी एमआरआय स्नॅनिंगमधूनही त्याच्या दुर्मिळ आजाराचे निदान झाले नाही. यावेळी रक्ताचे नमुने हैद्राबादला पाठवून देण्यात आले. त्यानंतर या दुर्मिळ आजाराची माहिती त्यांना मिळाली. तरीही यावर त्यांचा विश्‍वास बसला नाही. पुन्हा पुण्यात त्यांनी यावर उपचार घेतले व त्यावेळी पुन्हा रक्ताचे नमुने बंगळूरला पाठवून देण्यात आले. त्यावेळी पुन्हा तोच आजार असल्याची माहिती त्यांना डॉक्टरांनी दिली.

हा दुर्मिळ आजार असल्याची माहिती दिली. तसेच येत्या सहा महिन्यात जोलगेन्स्मा नावाचे १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्याच्या वडीलांची परिस्थिती हालाखीची असल्याने इतक्या मोठ्या रकमेचे इंजेक्शन तात्काळ उपलब्धन करून देणे न परवडणारे आहे. सध्या यावर बंगळूर येथे त्याच्यावर उपचार सुरु असून हे इंजेक्शन परदेशातून मागून घ्यावे लागणार आहे. सध्या सर्वम वरचेवर आजारी पडत आहे. जेवताना व बसताना त्यांना त्रास होत आहे. सध्या त्याला स्टीमद्वारे उपचार देण्याची सुचना बालरोगतज्ज्ञांनी केली आहे. त्यानुसार घरात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

सर्वमला स्पायनल मस्क्यूलर एट्रोपी (एसएमए-१) नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. याचे निदान नुकताच झाले आहे. सध्या सर्वमचे वय १ वर्ष ४ महिने असून २ वर्षाच्या आत त्याला जोलगेन्स्मा नावाचे सुमारे १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे.

महेश बाळेकुंद्री, वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT