पश्चिम महाराष्ट्र

सरकार मायबाप आमची सुरक्षितता तुमच्या हाती

रुपेश कदम

दहिवडी ः महाराष्ट्र शासनाने पशु वैद्यकीय सेवा अत्यावश्यक सेवेत घेतली असली तरी पशु संवर्धन विभाग अधिकृतरित्या अत्यावश्यक सेवेत घेण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पशुपालक तसेच जनावरांशी सर्वात जास्त संपर्क येणारा विभागच शासनाकडून दुर्लक्षित राहिलेला आहे.

लाॅकडाऊनच्या काळातही पशुधनाच्या आरोग्याची हेळसांड होवू नये यासाठी शासनाने पशु वैद्यकीय सेवा सुरु ठेवावी असे निर्देश दिले. त्यानुसार पशु वैद्यक त्यांची सेवा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवत आहेत. ही सेवा पुरविताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून पशु वैद्यक योग्य ती काळजी घेत आहेत. मात्र अनेकांशी संपर्क येत असल्यामुळे अजाणतेपणी पशु वैद्यकास कोरोनाची लागण होण्याचा धोका संभवतो. तसेच त्यामुळे पशु वैद्यकाचे कुटुंबासही संसर्ग होवू शकतो. संसर्ग होवू नये म्हणून घेण्यात येणाऱ्या काळजीला सॅनिटायझर, मास्क, हात मोजे यांच्या तुटवड्यामुळे मर्यादा येवू लागल्या आहेत. जे संसाधने उपलब्ध आहेत त्याच्या सहाय्यानेच पशु वैद्यक अत्यावश्यक सेवा पुरवित आहेत.

सातारा जिल्ह्यात पशुगणनेनुसार गायवर्ग व म्हैसवर्ग पशुधन ७३०१०६ आहे. शेळ्या ३०९०११, मेंढ्या २६४२२१, परसातील कुक्कुट १२१४१३४ व फार्ममधील कुक्कुट पक्षी २७६५४७७ आहेत. जिल्ह्यात एकूण १९२ पशु वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्था आहेत. जिल्हा पशु सर्वचिकित्सालय १, तालुका लघु पशु सर्वचिकित्सालय ५, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी१ ६०, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी२ १२५ आहेत. जिल्ह्यात पशुसंवर्धन आयुक्त १, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी १, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन ७, पशुधऩ विकास अधिकारी ८५, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ३०, पशुधन पर्यवेक्षक १४४, व वर्णोपचारक ५८ अशी पदे मंजून आहेत. मात्र त्यातील पशुधन विकास अधिकारी २० सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ७, पशुधन पर्यवेक्षक ३८, वर्णोपचारक १९ एवढी पदे रिक्त आहेत.

रिक्त पदांची संख्या मोठी असताना सुध्दा सध्या कार्यरत असणारे कर्मचारी देत असलेली सेवा कौतुकास्पद आहे. पशु संवर्धन विभागामार्फत औषध उपचार, कृत्रिम रेतन, अत्यावश्यक सेवा जसे शस्त्रक्रिया, गंभीर जखमांवर उपचार यासोबतच लसीकरण, वंध्यत्व निवारण, खच्चीकरण, गर्भ तपासणी, शवविच्छेदन, पशुरोग निदान, एक्स रे, सोनोग्राफी व पशु संवर्धन विभागाच्या विविध कल्याणकारी योजना आदी सेवा देण्यात येतात. आरोग्य विभागासारखेच फक्त माणसांऎवजी जनावरांना सेवा देण्याचे काम पशु संवर्धन विभाग करतो मात्र दोघांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीत मोठा फरक आहे. आरोग्य विभागाची सेवा अत्यावश्यक सेवेत, काम पुर्ण क्षमतेने, विमा संरक्षण व वेतन पुर्ण दिले जात आहे. तर पशु संवर्धन विभागाची सेवा अत्यवाश्यक सेवेते नाही मात्र काम पुर्ण क्षमतेने, तर विमा संरक्षण नाही व वेतन दोन टप्प्यात असा फरक करण्यात आला आहे.

त्यामुळे पशु संवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांची माफक अपेक्षा आहे की पशु वैद्यकीय सेवा अधिकृतरित्या अत्यावश्यक सेवेत घेण्यात यावी. सुरक्षितरित्या काम करण्यासाठी संरक्षक किट मिळावीत. आरोग्य विभागाप्रमाणेच सक्षम विमा संरक्षण मिळावे या अपेक्षा करण्यात येत आहेत.

सातारकरांना घरोघरी दूध मिळणार

काय सांगता ! दारू दुकानच अनलॉक व्हयं

बेजाबदारपणामुळे कऱ्हाडची कोरोनाची साखळी सातारला पाेहचली ?

रस्त्यावर तडफडणाऱ्या वृद्धास डाॅक्टर काकांचा आधार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवा इतिहास अन् प्रभावी कामगिरी... शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या RSSला महाराष्ट्र BJPकडून अनोखी गुरूदक्षिणा

IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हातातून महाराष्ट्र गेला, आता मुंबईही जाणार? महापालिका निवडणुकीत महायुतीचा प्रभाव

Maharashtra Assembly Election 2024 Result: धाकधूक... हुरहूर... अन्‌ जल्‍लोष

"आमचा राजा नाही, महाराष्ट्र हरलास तू"; मनसेच्या धक्कादायक पराभवानंतर मराठी अभिनेत्रीने केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT