पश्चिम महाराष्ट्र

Video : मृतदेह घरातच ठेवणारे अर्णवचे आई-बाबा असे का वागले?

सकाळ वृत्तसेवा

मेढा (जि.सातारा) : जावळी तालुक्‍यातील म्हाते खुर्द गावातील अर्णव जयवंत दळवी  या साेळा वर्षीय मुलाचा मृतदेह तीन दिवसांपेक्षा अधिक आपल्या घरातच लपवून ठेवणाऱ्या आई, वडील व त्याचा मोठा भाऊ यांना पोलिसांनी आज (सोमवार) चौकशीसाठी ताब्यात घेवून कोरोनाच्या टेस्ट तपासणीसाठी वाई येथे नेले. त्यानंतर त्यांना त्यांचे तपासणी अहवाल येईपर्यंत रायगांव येथील विलगीकरण कक्षात ठेवणार आहे. रविवारी रात्री उशिरा अर्णव याच्यावर म्हाते खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने शवविच्छेदन अहवालातही मृत्यु कशाने झाला हे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे या मृत्युची नोंदही मेढा पोलिस स्टेशनला आकस्मित म्हणूनच नोंद झाली आहे.
 
अणर्वचा मृत्यु कसा झाला असेल, कोणी मारले असेल, का? घातपात असेल तर तो कोणी आणि कशासाठी केला, तो कोरोना पॉझिटिव्ह तर नव्हता ना, मग जन्म देणारे माता पिता आपल्या लेकराचा मृत्यु झाल्यावर दोन ते तीन दिवस कसे गप्प बसतील, आजारी लेकरू असेल तर त्याचा दवाखान्यात का नेले नाही. असे एक नव्हे तर अनेक प्रश्न ग्रामस्थांना पडले आहेत. अर्णवच्या मृत्यूची चर्चा गावात आहे. ग्रामस्थांनी या कटुंबियांच्या घराकडेच पाठ केली असून पोलिसांनीही येथे येण्यास मजाव केला आहे. एकूणच घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
या दुदैवी घटनेमुळे सर्वच धास्तावले असून तो कोरोनाग्रस्त नसेल ना याची चिंता अनेकांना लागली आहे. या मृत्युचे नेमके गुढ काय आहे? याचा तपास करण्याची ही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. एकतर म्हाते खुर्द गावच्याच म्हाते मुरा येथे दोन कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याने अगोदर भितीच्या छायेखाली असणारे ग्रामस्थ त्या दोघांचे अहवाल निगेटीव्ह आले म्हणून निःश्वास टाकत असतानाच या घटनेमुळे चांगलेच हादरले आहेत.

27 मार्चला हे कुटुंब म्हाते येथे आले. मात्र मुंबईवरून येताना ते सातारा येथे आले. सातारहून गावाला येण्यासाठी त्यांच्याजवळ वाहन नसल्याने आईवडील व दोन भाऊ सुमारे 35 किलोमीटर अंतर पायी चालत आल्याचे संबंधितांनी माहिती दिली. मग येवढे अंतर कापणारा तो अचानक आजारी कसा झाला असा प्रश्नही काही उपस्थित करत आहेत. घटनास्थळी तहसिलदार शरद पाटील, पोलिस उपअधीक्षक अजीत टीके, सहायक पोलिस निरीक्षक निलकंठ राठोड, गटविकास अधिकारी सतीश बुध्दे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवानराव मोहीते यांनी रात्री व आज (सोमवार) सकाळी भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना विविध सुचना दिल्या.

या अघोरी प्रकारामुळे म्हातेगावांसह तालुक्‍यात विविध चर्चेना उधाण आले असून त्या मृतदेहाच्या झालेल्या दुरावस्थेबदल हळहळ व्यक्त होत आहे. अर्णवचे वडील मुलगा सहा महिन्यापासून आजारी होता, दहावीला असल्यामुळे त्याला प्रयोगशाळेत इंन्फेशन झाले अशी तफावत असलेली उत्तरे प्रशासनाला देत होते. त्यामुळे प्रशासन देखील गाेंधळात पडले आहे.

म्हाते खुर्द येथील घडलेली घटना दुदैवी असून त्या कुटंबातील तिघांची कोरोना टेस्ट करून रायगांव येथील विलगीकरण कक्षात अहवाल येईपर्यंत ठेवण्यात येणार आहे.
शरद पाटील, तहसिलदार, जावळी. 

धक्कादायक ः पोटच्या मुलाचा मृतदेह तीन दिवस घरातच ठेवला लपवून 

सातारा : खवय्यांसाठी पर्वणी; घरपाेच मागवा आवडीचे पदार्थ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT