पश्चिम महाराष्ट्र

मुंबई पुणेकरांना रोजगार हमीची संधी; कोट्यावधीची मजुरी जमा

हेमंत पवार

कऱ्हाड ः लॉकडाउनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या मजुरांची परवड होऊ नये, त्यांच्यावर उपसमारीची वेळ येऊ नये, यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेसह शासनाच्या अन्य विभागांनी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू केली. त्याला चांगले यश आले असून, जिल्ह्यात तीन महिन्यांत 25 हजार 961 मजुरांच्या हाताला काम मिळाले. त्यापोटी तीन कोटी 37 लाखांची मजुरी त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेंतर्गत झालेल्या कामांत सर्वाधिक 17 हजार 31 मजुरांचा समावेश आहे. लॉकडाउन काळातही जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला या योजनेतून काम मिळून त्यांची चूल पेटण्यास मदत झाली आहे. 

जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाउन काळातही रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामध्ये राज्य, परराज्यांतील मजुरांच्या हाताला काम देण्याचे निर्देशित होते. त्याव्दारे मागेल त्याला काम देऊन त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांतर्फे या योजनेची कार्यवाही राबवली.
 
लॉकडाउन काळात मागील तीन महिन्यांत सर्व यंत्रणांकडून विविध कामांव्दारे 25 हजार 691 मजुरांच्या हाताला काम देण्यात आले. त्यापोटी त्यांच्या खात्यावर तीन कोटी 37 लाखांची मजुरी जमा करण्यात आली आहे. त्यात ग्रामपंचायत विभागामार्फत सर्वाधिक 17 हजार 31 मजुरांना काम मिळाले असून, त्यांच्या खात्यावर दोन कोटी 22  लाख 73 हजार 800 रुपये जमा करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीमार्फत गावोगावी रोजगार हमी योजनेची कामे करण्यात आली. त्यामध्ये सिंचन विहीर, वृक्षलागवड, रस्ते, फळबाग लागवड, विहीर पुनर्भरण, शोषखड्डे, गांडुळ खतनिर्मिती, घरकुल आदी कामांचा समावेश आहे. त्याव्दारे मोठ्या प्रमाणात मजुरांना त्यांच्या गावातच कामे उपलब्ध झाली आणि मजुरीही मिळाली. त्यामुळे ग्रामीण भागात फारसा रोजगाराचा प्रश्न आला नाही. 


रोजगार हमी योजना..

रोहयोचा वार्षिक कृती आराखडा 11 कोटी 32 लाख 
ग्रामपंचायत, कृषी, वन, वनीकरण, रेशीम, बांधकामाचा समावेश 
वर्षभरात संभाव्य प्रस्तावित कामे सुमारे 22 हजार 
 


मुंबई-पुण्यासह अन्य ठिकाणांवरून नागरिक मोठ्या प्रमाणात गावी आले आहेत. त्यांनी जर वैयक्तिक किंवा सार्वजनिक कामांची रोजगार हमी येजनेतून मागणी केल्यास आम्ही त्यांना काम देऊ. त्यासाठी त्यांनी नियमानुसार कामाची मागणी करावी. 

-अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT