कऱ्हाड ः हिंदू एकता आंदोलनच्या पाटण तालुका शाखेतर्फे सुपने विभागात दोन- दोन टन टोमॅटोचे मोफत वाटप करण्यात आले. सुपन्याचे युवा शेतकरी सुनील माळी यांनी स्वतःच्या शेतातील टोमॅटोचे मोफत वाटप करण्याची इच्छा पाटणचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानुसार गरीब व गरजू लोकांना आज दोन टन टोमॅटोचे मोफत वाटप करण्यात आले.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली व अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने सुपने, वसंतगड, किरपे, संजयनगर गावांमध्ये टोमॅटोचे मोफत वाटप केले. सुनील माळी यांनी मोठेपणा दाखवून केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे. गणेश पाटील यांनी श्री. माळी यांचा त्यासाठी सन्मान केला.
या वेळी अजिंक्य ग्रुपचे अध्यक्ष सागर पडवळ, ग्रामपंचायत सदस्य तुषार शिंदे, प्रकाश पाटील, केदारनाथ ग्रुपचे अध्यक्ष अजित जाधव, वसंतगडचे उपसरपंच संदीप सावंत, शांताराम कदम, सुनील सावंत, सुहास गायकवाड, संदीप पाटील, रवींद्र पाटील, अमोल शिंदे, स्वप्नील शिंदे, अमोल पाटील, अजित देसाई, किरण चव्हाण, अनिल कोळी, संतोष पाटील यांच्यासह अजिंक्य, केदारनाथ, राजवीर ग्रुप, गणेश स्पोर्टस, भाग्योदय गणेश मंडळ, हिंदू एकताचे कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्धवजी, लोकांचे जीव वाचवा आणि जगण्याची साधनंही...
Coronavirus : मुंबईतील सातारकरांनो घाबरु नका; कोरोनाचा संसर्ग राेखण्यास मदत करा
महाबळेश्वर संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून लाखाची मदत
सातारा : कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी महाबळेश्वर येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीस एक लाखाची मदत केली आहे. जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या आणि जिल्ह्याचे वैभव असलेले महाबळेश्वर येथील गडकिल्ले, विविध स्थळांचे, वनसंपदेचे रक्षण करणे हे प्रथम कर्तव्य मानणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीने नेहमीच सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखविली आहे. या जाणिवेतून संयुक्त वन व्यवस्थापन महासमिती व वन विभागामार्फत एक लाख रकमेचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सुपूर्द केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.