पश्चिम महाराष्ट्र

मस्तच : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात आज 15 जण काेराेनामुक्त

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड / सातारा : सातारा जिल्ह्यातील पंधरा कोरोना बाधित रुग्ण आज (साेमवार) कोरोना मुक्त झाले. ही बाब सातारा जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. यामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथील  अकरा व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय (कराड) येथील चाैघांचा समावेश आहे. या सर्व 15 रुग्णांची 14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये या सर्व पंधरा काेरोना बाधीत रुग्णांचे रिपाेर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांना आज (साेमवार) घरी सोडण्यात आले.

कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 11 जणांना कराड चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले या कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

आत्तापर्यंत क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथून 8 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथून 23 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 असे जिल्ह्यातील  एकूण 35 रुग्ण कारोना मुक्त  झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

132 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

दरम्यान क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे तीन, कृष्णा मेडिकल कॉलेज ( कराड) येथे 66, उपजिल्हा रुग्णालय (फलटण) येथे 31, ग्रामीण रुग्णालय (कोरेगाव) येथे 18 व ग्रामीण रुग्णालय (वाई) येथे 14 असे एकूण 132 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

जिद्द आणि वील पॉवरमुळेच हे घडले

जिद्दीने आणि वील पॉवरमुळेच आपल्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटावर डॉक्टरांच्या मदतीने मात करुन कृष्णा हॉस्पीटलमधील ११ तर वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातुन चार जण आज (सोमवारी) कोरोनामुक्त झाले. त्यामध्ये वनवासमाची, मलकापुर, आगाशिवनगर, कापील, कामेरी येथील रुग्णांचा समावेश होता. संबंधित १५ जणांना आज टाळ्यांच्या गजरात हॉस्पीटलमधुन निरोप देण्यात आला.

कऱ्हाड तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुण्यानंतर कऱ्हाड कोरोनासाठी हॉटस्पॉट झाले आहे. यापुर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ८६ झाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष कऱ्हाडकडे लागले आहे. दरम्यान रुग्ण बरे होण्याचेही प्रमाण अलिकडे वाढले आहे. त्यामध्ये कृष्णा हॉस्पीटलमधील बरे झालेले रुग्ण सर्वाधिक आहेत. रुग्णांची वील पॉवर, जीद्द आणि कृष्णा हॉस्पीटलमधील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने आत्तापर्यंत २३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान आज (सोमवारी) येथील कृष्णा हॉस्पिटलमधून बरे झालेल्या ११ जणांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. त्यामध्ये वनवासमाची येथील 32 वर्षीय महिला, 38 वर्षीय युवक व 13 वर्षीय मुलगा, आगाशिवनगर येथील 25 व २७ वर्षीय युवक आणि 65 वर्षीय वृद्ध गृहस्थ, मलकापूर येथील 54 वर्षीय पुरुष, कापील येथील 11 वर्षीय मुलगा, 49 वर्षीय गृहस्थ तर कामेरी येथील 48 वर्षीय पुरुष, मिरेवाडी-फलटण येथील 28 वर्षीय युवक यांचा समावेश आहे.

Coronavirus : जिवाचा धोका पत्करुनही परिचारीका तीन महिने पगारविना

त्यांना आज टाळ्यांच्या गजरात हॉस्पीटलचे डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करुन घरी सोडले. त्यावेळी बरे झालेलेही भारावुन गेले होते. हॉस्पीटलच्यावतीने कृष्णा चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, तहसीलदार अमरदीप वाकडे, अधिष्ठाता डॉ. ए. वाय. क्षिरसागर, डॉ. संजय पाटील, श्री. माशाळकर, तालुका आऱोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख, मंडल अधिकारी  पी. डी. पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. दरम्यान येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातुनही चार रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे संबंधितांनी हॉस्पीटलचे डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

थंड पाचगणी... काेराेनाच्या फटक्याने गरम

केशरी रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी 

अरे वाऽऽऽ आता बिनधास्तपणे न्याहाळा 'ते' सौंदर्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT