साातारा : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वच सातारकरांनी मनावर घेणे महत्वाचे आहे. शहरातील असणाऱ्या प्रमुख तिन्ही भाजी मंडई बंद ठेवण्यात आल्या असून पालिकेने 40 वॉर्डासाठी 37 भाजी विक्रीच्या गाड्या घरोघरी भाजीपाला पोहच करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील नागरिकांनाही वारंवार सूचना जिल्हा प्रशासन म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी विनंतीवजा केल्या मात्र काहीही फरक पडत नसल्याचे चित्र आहे.
त्यातच आता सदरबझार परिसरात काेराेनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे तेथील परिसर प्रतिबंधात्मक केला आहे. सातारा शहरातील नागरिकांनी घरा बाहेर पडू नये त्यांच्या घरपोच भाजीपाला पोहच करण्यासाठी पालिकेने प्रत्येक वॉर्डासाठी एक भाजीपाल्याची गाडी अशा 40 वॉर्डासाठी 37 गाड्या यापुर्वीच सुरू केल्या आहेत.
तरी नागरीकांना त्यांना आवश्यक असणारा भाजी पाला घरपाेच विक्रेत्यांशी संपर्क साधून घ्यावा असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गाेरे यांनी केले आहे.
दिनांक 29.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी
कऱ्हाडला किराणासह भाजीपालाही मिळणार घरपोच
कऱ्हाड ः शंभर टक्के लॉकडाऊन झालेल्या कऱ्हाड शहरात किराणा व भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. ती मागणी व गरज लक्षात घेवून एक मेपासून घरपोच किराणा व भाजीपाला घरपोच देण्यात येणार आहे. पालिक व पोलिसांच्या झालेल्या बैठकीत निर्णय झाला. प्रत्येक प्रभागनिहाय त्याचे नियोजन केले जाणार असून स्थानिक नगरसेवकांकडे त्याची जबाबदारी राहणार आहे. त्यासाठी नगरसेवकांनी स्वयंसेवकांची मदत घेवून ती योजना राबवावी, असेही बैठकीत ठरले आहे. योजनेस मूर्त स्वरूप आल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
शहरासह त्या लगतच्या 11 गावात शंभर टक्के लॉकडाऊन जाले आहे. कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तो निर्णय घेतला आहे. 23 एप्रिलपासून शंभर टक्के बंद आङे. मात्र नागरीकांच्या औषध, भाजपीला व किराणा या मुलभूत गरजा पूर्ण करण्याची आवश्यकत्या आहे. त्याबाबतची मागणी होवू लागल्याने प्रशासनाने त्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी बैठक घेतली. प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे, उपाध्यक्ष जयवंत पाटील, गटनेते राजेंद्र यादव, विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर उपस्थित होते. त्या बैठकती शहरात एक मे पासून घरपोच किराणा व भाजीपाला देण्यात येणार असल्याचे छरले. त्यासाठी शहरातील सर्व नगरसेवकांच्या मदतीने योजना राबवली जाणार आहे. योजनेच्या पूर्वतयारीची झाली आहे. शहरात सुमारे एक लाख लोकसंख्या आहे. मात्र शहराच्या परिसरात कोरोना वाढल्याने त्याची लागण शहरातपर्यंत येवू नये, यासाठी शहरासह त्या लगतचा भाग शंभर टक्के लॉक डाऊन केला आहे. त्या काळात दूधाला परवानगी देण्यात आळी आहे. त्यासोबत घरपोच औषधाचीही व्यवस्था केली आहे. मात्र औषध घरपोच योजना अद्यापही तेवढ्या ताकदीने राबवलेली गेलेली नाही. त्यानुसार शहरात किराणा व भाजीपाल्याची सातत्याने मागणी वाढली. त्याची दखल घेवून त्याचा निर्णय घेण्यासाठी बैठक झाली. किराणा व भाजीपाला एक मेपासून घरपोच देण्यात येणार आहे. त्याचे नियोजन नगरसेवकांकडे देण्यात आले आहे. प्रभागातील नगरसेवकांनी नागरिकांना घरपोच किराणा व भाजीपाला द्यायचा आहे. यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे.प्रांताधिकारी उत्तम दीघे यांनी योजनची व्याप्ती सांगितली. पोलीस निरीक्षक पाटील यांनी योजना कशी राबवता येईल, याची चर्चा केली. नगरसेवकानी शंका मांडल्या. त्यास उत्तरे दिली. अन्य कोणत्याही प्रकारे शहरात भाजीपाला विक्रीस परवानगी दिली जाणार नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्याऐवजी घरपोच भाजीपाला आणि किराणा देण्यात येणार आहे. नगराध्यक्षा शिंदे यांनी शासन ज्या पद्धतीने सांगेलं, त्या पद्धतीने योजना शहरात राबवण्यासाठी आम्ही सर्व सहकार्य करू असे स्पष्ट केले.
किराणाची सुरवात, नंतर भाजीपालही देणार
एक मेपासून आठ दिवस आमि त्यानंतरच्या काळातही सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. गहू, तांदूळ, तेल, तूरडाळ, चटणी अशा आठ किराणा वस्तू एकत्रितपणे स्वरूपात नागरिकांना घरपोच देण्यात येतील. मागणीप्रमाणे त्याचे पैसे नागरिकांनी द्यावयाचे आहेत. योजना यशस्वी झाल्यानंतर भाजीपालाही याच पद्धतीने कीट स्वरूपात देण्यात येणार आहे. एकाच दराने वस्तू दिल्या जाणार आहेत. शहरात 14 प्रभाग आहेत. त्या प्रभागात नगरसेवकांनी स्वयंसेवकांच्या मदतीने घरपोच सेवा देणारी यंत्रणा उभी करायची आहे.
घरपोच औषधांसाठी मेडिकल असोसिएशन सज्ज
औषध दुकानदार संघटनेकडून जाहीर करण्यात आलेली नावे :
कऱ्हाड शहर - हेमंतकुमार मोरे (भाग्यश्री मेडिकल - 9823147324), गिरीश गुजर (राजाराम मेडिकल - 9423513333),उमेश भट्टड (अवनिश फार्मा - 9850690127), महेंद्र काशिद (ज्योती मेडिकल - 9763015904), अरविंद चव्हाण (गणेश आयुर्वेदिक - 9822099002), प्रकाश गवळी (वैष्णवी मेडिकल - 9823322892), मनोज कुलकर्णी (महाराष्ट्र मेडिकल - 9822195564), नितीन पटेल (उमेया मेडिकल - 9422402113), मुकुंद पवार (साई सर्जिकल - 9420606462), धीरज घाडगे (जय मेडिकल - 9552527475).
मलकापूर- सागर पाटील (चिरायू फार्मा - 9623422699), सागर जाधव (सुमन मेडिकल - 9423865525), 3) अजय भट्टड (गणेश मेडिकल - 9822060246), शरद बागल (शुभम फार्मा - 9823385369), हणमंतराव माने (दर्शन फार्मा - 9422034077), अनिस मणेर (बाबा मेडिकल - 9422067860), दिग्विजय मोरे (विजया मेडिकल - 9096793787).
सैदापूर परिसर- सतीश पाटील (नाकोडा मेडिकल - 9850520001), युवराज पाटील (लोकमान्य मेडिकल - 9960280268).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.