पश्चिम महाराष्ट्र

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची उद्धव सरकारपुढे आर्त हाक

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा)  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लागू झालेल्या लॉकडाउनने हातावर पोट असणारे समाजातील विविध घटक पूर्णपणे अडचणीत आले आहेत. राज्यातील हजारो लोकवंतांचीही कुटुंबे सध्या अशीच जगण्यासाठी लढाई करीत आहेत. या हंगामात खेळ मांडण्यापूर्वीच तो मोडून घरचा रस्ता धरावा लागलेल्या लोककलावंतांच्या कुटुंबांना शासनासह सेवाभावी संस्था व नागरिकांनी आधार देऊन त्यांना सावरावे, असे आवाहन लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी आज "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.
 
कोरोनामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीबाबत बोलताना सुरेखा पुणेकर यांनी लोककलावंतांपुढे सध्या उभ्या राहिलेल्या अनेक प्रश्नांना स्पर्श तर केलाच, शिवाय आम्ही घरात थांबलोय, तुम्हीही विनाकारण बाहेर फिरू नका. आवश्‍यक खबरदारी घेऊन स्वतःबरोबरच कुटुंबालाही जपा, असे आवाहनही त्यांनी रसिक प्रेक्षक आणि मायबाप जनतेला केले आहे. त्या म्हणाल्या, ""वर्षातील मार्च ते जूनपर्यंतचा कालावधी आम्हा कलावंतांसाठी खऱ्या अर्थाने एक प्रकारच्या लढाईचाच काळ असतो. पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे कलावंत आणि कामगार आपल्या मंडळांसोबत राज्याच्या कानाकोपऱ्यात धावत असतात. या तीन महिन्यांत जेवढे पदरात पडेल त्यावरच त्यांचे वर्षाचे गणित अवलंबून असते. रोजच्या भाकरीसह लोकांची देणी- घेणी, औषधपाणी, मुलांचं शिक्षण असा कलाकारांचा संसार गाडा तर चालतो; परंतु यावर्षी कोरोनामुळे सर्वच जागी थबकल्याने समाजातील हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबासमोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. त्यामध्ये लोककलावंतही आहेत. दर वर्षीप्रमाणे कलाकारांची जुळणी आणि कार्यक्रमाची तयारी पूर्ण करून बसलेल्या लावणी शो, ऑर्केस्ट्रा, तमाशा मंडळांसह अन्य कार्यक्रमातील कलाकारांवर खेळ मांडण्यापूर्वीच तो गुंडाळण्याची वेळ आली आहे.
 
यात्रा रद्द झाल्याने दोन-तीन महिन्यांपूर्वी ऍडव्हान्स बुकिंग झालेले शो रद्द झाले आहेत. शो थांबल्याने कलाकार घरी परतले असून, पावसाळा कसा ढकलायचा असा प्रश्न गोरगरीब कलाकारांपुढे उभा आहे.'' सध्याच्या कठीण परिस्थितीत शासनापुढेही अनेक प्रश्न आणि आव्हाने असताना त्यांनीही कुणाकुणाकडे लक्ष द्यायचे, हे जरी खरे असले तरी समृद्ध व संपन्न महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या या घटकांना दुर्लक्षू नये, त्यांना योग्य वेळी योग्य मदतीचा हात दिला जावा, अशी अपेक्षा असल्याचेही पुणेकर म्हणाल्या. रसिकांपुढे आपली कला सादर करणाऱ्या कार्यक्रमांच्या मालकांसमोर गेल्या वर्षभरापासून अनेक अडचणी उभ्या आहेत. महापूर, दुष्काळ, बदलते नियम, कार्यक्रमात प्रेक्षकांकडून होणारी हुल्लडबाजी, कलाकारांना होणारा त्रास अशा अनेक अडचणी सोसत इथंवर आल्यावर उभे राहिलेले हे नवे संकट लोककलावंतांना न पेलवणारे आहे. अनेक जण आमच्याशी मोबाईलवरून हे संकट कधी संपेल व कधी सारे ठिकठाक होईल, अशी विचारणा करत असून, घरातच थांबा, बाहेर फिरू नका. काळजी घ्या असे सांगून आम्ही त्यांना धीर देतोय.

उद्धवजी, लोकांचे जीव वाचवा आणि जगण्याची साधनंही...

सलून व्यावसायिक आणि त्यांच्या ग्राहकांसाठी महत्वपुर्ण बातमी

रामायण, महाभारत बरोबरच ‘या’ मालिकाही सुरू करा : पृथ्वीराज चव्हाण

सध्या उभ्या ठाकलेल्या संकटामुळे शेतकरी, मजूर, कामगार, उद्योग-व्यवसाय आदींसमोर अडचणी वाढल्या आहेत. स्वयंशिस्त पाळूनच आपणा सर्वांना हे संकट परतून लावावे लागेल. त्यासाठी आम्हीही घरीच थांबलो आहोत. तुम्हीही घरीच थांबा. 
सुरेखा पुणेकर, (लावणी कलावंत).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT