सातारा : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्पा संपण्यास पाच दिवसांचा अवधी राहिला असतानाच सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून मद्य विक्रीला अखेर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवानगी दिली आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत मद्य विक्रीची दुकाने सुरू राहतील विक्रेत्यांनी आणि ग्राहकांनी साेशल डिस्टंटस पाळावे अन्यथा कडक कारवाई केली जाईल असे प्रशासनाने आज (मंगळवारी) दुपारी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.
दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अ.बा.चासकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनमेंट झोन वगळून किरकोळ मद्य विक्रीच्या दुकानांचे व्यवहार सुरु करण्याबाबत अटी- शर्तींसह परवानगी दिली आहे. सातारा जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागातील कंटेनमेंट झोन वगळून किरकोळ मद्य विक्रीचे व्यवहार सुरू राहतील.
दरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 मार्च रोजी देशभर लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर तब्बल 50 दिवसांनतर उद्या (बुधवार) सातारा जिल्ह्यात दारु विक्रीची दुकाने सुरु हाेणार आहेत. जिल्ह्यातील दारु विक्रेत्यांनी ग्राहकांचा गोंधळ उडू नये यासाठी दुकानाच्या बाहेर बॅरीकेटस लावण्यास प्रारंभ केला आहे.
विक्रेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.