सातारा : सदरबझार येथील भिमाबाई आंबेडकर स्मारक जवळ हाेगार्ड आपली सेवा बजावित हाेता. तेथील युवकांना होमगार्ड कर्मचाऱ्याने तुम्ही मास्क का नाही लावले अशी विचारणा केली. त्यावर युवकांनी त्यास बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर पाेलिसांनी सुमारे 15 जणांसह तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. संबंधितांना सध्या तरी पाेलिस स्थानकाच्या बाहेर बसविण्यात आले आहे.
लाॅकडाऊनच्या काळात पाेलिस यंत्रणा अहाराेत्र झटत आहे. त्यांच्या मदतीला हाेमगार्ड, पाेलिस मित्र असे घटक आहेत. सर्वजण आपआपल्या परीने कर्तव्य बजावत आहेत. आज (गुरुवार) सकाळी दहाच्या सुमारास सदरबझार येथील भिमाबाई आंबेडकर स्मारक नजीक हाेमगार्ड कर्तव्य बजावत हाेता. त्यावेळी एका युवकाने मास्क घातलेला नव्हता. त्यास हाेमगार्डने विचारले असता ताे पळून गेला. पळताना ताे पडला. काही अंतरावरुन पुन्हा हाेमगार्डच्या दिशेने काही जण आले. त्यांनी हाेमगार्डला मारहाण केली.
या घटनेची माहिती पाेलिस स्टेशनला समजली. वरिष्ठांच्या देखील कानावर घटना गेली. त्यांनतर जादा कुमक घेवून पाेलिस घटनास्थळी गेली. तेथून त्यांनी सुमारे 18 जणांना ताब्यात घेऊन शहर पाेलिसांता आणले आहे. या घटनेची चाैकशी सुरु आहे. चाैकशीअंती नेमका प्रकार आणि गुन्हा दाखल झालेल्यांची नावे निष्पन्न हाेणार आहेत.
दरम्यान सातारा जिल्ह्यात काेराेनाची परिस्थिती चिघळू नये यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पहिल्या दिवसापासून प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमध्ये सातत्य देखील आहे. कधी ते दुचाकीवरून सातारा शहरात फेरफटका मारुन विनाकारण शहरात फिरणारे नागरिक रस्त्यावर आढळले तर त्यांच्यावर कारवाई करा अशा सूचना देत आहेत. सातारा जिल्हामध्ये बाहेरगावातील लाेक येऊ नयेत अशी सक्त ताकीद देखील त्यांनी पाेलिसांनी दिली. याबराेबरच पाेलिसांची चांगल्या कामाची ते काैतुक करीत आहेत.
काेराेनाची ड्युटी बजाविणारे पाेलिस कर्मचारी यांचा सन्मान करण्यासाठी शासनाने पदक द्यावे असेही गृहराज्यमंत्री देसाई यांनी नमूद केले. परंतु दूसरीकडे मात्र जनता काही केल्याने पाेलिसांचे एेकत नसल्याचा प्रकार सातत्याने समाेर येऊ लागला आहे. नागरीक माेठ्या संख्येने वाहन रस्त्यावर आणत आहेत. वाहने जप्त केली तरी तेवढीच दुप्पटीने वाढत आहेत असा प्रकार दिसून येताे. त्यातच कर्तव्य बजाविणारे पाेलिसांना काही दिवसांपुर्वी एका माथेफिरुने मारहाण केली. आता आज हाेमगार्डवर हल्ला झाला.
संबंधितांवर गुन्हा दाखल हाेईल परंतु गृहराज्यमंत्री आणि पाेलिस दल झटून काम करीत असतील तर त्यांनी सहकार्य केले पाहिजे अशी भावना नागरीकांची हवी.
हाेमगार्डला मारहाण झाल्याची माहिती साेशल मिडियावर पसरताच अनेकांनी या कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे.
कर्जवसुलीसाठी बॅंकखाती सील; अनेकांच्या हाती पगाराचा भाेपळा
ब्रेकिंग : अवघ्या काही तासांत कराडला तीन रुग्ण पाॅझिटिव्ह; साताराची संख्या 21 वर
अटकेपुर्वीच वाधवानांच्या सुटकेचे रंगलंय राजकारण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.