वाळू तस्करी 
पश्चिम महाराष्ट्र

'तहसील'च्या आवारातच शेतकऱ्यावर रोखले पिस्तुल; वाळू ठेकेदारांची मुजोरी

सचिन शिंदे

कऱ्हाड ः वाळू ठेक्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना तहसीलदार कार्यालयाच्या आवारतच झालेली मारहाण वाळू ठेकेदारांची वाढती मुजोरी स्पष्ट करणारा आहे. सरकारी कार्यालयातच शेतकऱ्यांवर पिस्तुल रोखण्याचा झालेला प्रकार निंदनीय आहेच. त्याहीपेक्षा त्या प्रकाराची पोलिस ठाण्यात दाखल करण्यासाठी झालेली चालढकल व त्यातून झालेल्या सेटलमेंट वाळू व्यवसायिकांच्या मुजोरगिरीला बळ देणाऱ्या ठरत आहेत.

तहसीलदारांनी कालच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल करण्याचा अहवाल देणार असल्याचे जाहीर केले आहे. तोही अहवाल सत्य परिस्थितीचा असावा. काल तहसीलदार कार्यालयाच्या आवारात झालेल्या मारारामारीच्या प्रकरणानंतर ज्या गतीने प्रकरण रफादफा केले गेले. मारहाण झालेले शेतकरी पोलिस ठाण्याकडे फिरकले नाहीत. इतका मोठा त्यात झालेला राजकीय हस्तक्षेप बरेच काही सांगून जातो. 

येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारातच वाळू उपशाला विरोध केला म्हणून शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत वाळू व्यवसायिकांनी मारहाण केली. काल सायंकाळी घटना घडली. त्याचा गुन्हा दाखल अद्यापही झालेला नाही. तो दाखल करू नये, असा प्रशासन, पोलिस व संबधित शोतकऱ्यांवर मोठे राजकीय दडपण आले आहे. त्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एकाला रात्री उशिरा सोडून देण्यात आले आहे.  वाठार येथे दोन गटात वाळू उपसा सुरू आहे. तो अवैध आहे. त्यावर कारवाई करावी, अशी मागणी वाठारच्या ग्रामस्थांनी केली होती. एक गट सोडून दुसऱ्या गटातून होणार उपसा बेकायदेशीर आहे. असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्या भागाची पहाणी तहसीलदार कार्यालयाने आज केली. त्याची कार्यावाही सुरू होती. त्यावेळी सरेच लोक होते. त्यानंतर सर्वजण येथील तहसीलदार कार्यालयात आले. त्यावेळी शेतकऱ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला.

शेतकऱ्यांना पिस्तल रोखून झालेवी माराहण चुकीची आहे. त्याचा लेखी अहवाल देणार असल्याचे तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी काल सांगितले आहे. त्यानुसार ते काय अहवाल देणार याकडे लक्ष लागून आहे. घटनेने वाळू व्यवसायिकांच्या मुजोरीपणाला लगाम कोण लावणार हाच प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात मुबलक वाळू आहे. त्या वाळू उपशातून होणारा गैरप्रकारही काल समोर आला आहे. त्या गोष्टीलाही लगाम लावण्याची गरज आहे. आपला गट सोडून शेजारच्या गटातून होणारा वाळू उपसा तपासण्यासाठी गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यावरही हल्ला झालेल्या घटना ताज्या आहेत. अश बिकट स्थिती असतानाही वाळू व्यवसिकांशी अर्थपूर्ण संबध ठेवणाऱ्या शासकीय यंत्रणेबाबत अधिक धोका निर्माण झाला आहे. काल मारहाणीनंतर शेतकऱ्यांसह यंत्रणेला वेठीस धरून दबाव आणण्याचा झालेल्या हालचाली वाळू व्यवसायिकांना बळ देणाऱ्या ठरत आहेत. त्यावर योग्य कारवाई आखण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. 

वाळू व्यवसायाशी संबधित सर्वच व्यवहार या घटनेने चर्चेत आले आहेत. त्या सगळ्या तक्रारींची सडेतोड चौकशी होण्यासाठी महसूल व पोलिस खात्याने प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. त्या कामात संयुक्त प्रामाणीकपणा महत्वाचा ठरणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT