पश्चिम महाराष्ट्र

योग्य भाव मिळत नाही तोवर कांद्याची विक्री बंद; शेतकरी ठाम

केशव कचरे

बुध (जि.सातारा) : कांद्याचे दर घसरल्याने खटाव, माण तालुक्‍यांतील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. यावर्षी उत्तर खटाव परिसरातील बुध, काटेवाडी, नागनाथवाडी, डिस्कळ, फडतरवाडी, राजापूर, ललगुण, वेटणे, विसापूर, खातगुण, पुसेगाव या बागायती पट्टयातील शेतकऱ्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले आहे. मात्र, दिवसेंदिवस कांद्याच्या दरात सुरू असलेल्या घसरणीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्‍किल झाल्याने आर्थिक कोंडीत सापडला आहे.
 
मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात दर अधिकच कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. कोरोनामुळे व्यापारी वर्गही हतबल झाला आहे. टाळेबंदीमुळे लोक घरातच आहेत. हॉटेल, मॉल व बहुतांशी बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे सर्व भाजीपाल्याचे दर कोसळले असून, कांद्याची अवस्था तर त्याहून वाईट झाली आहे. गेल्या वर्षी 100 रुपये किलोने विकला गेलेला कांदा आज बाजारात 8 ते 10 रुपये किलोने विकला जात आहे. देशात संचारबंदी लागू असल्याने माल वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद आहेत. अवकाळी पावसाच्या भीतीने अनेक शेतकरी आपला कांदा मिळेल त्या भावात विकत आहेत. परिणामी मागणी कमी आणि आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दरातील घसरण सुरूच राहिली आहे. कर्नाटकातील हुबळी, दावणगिरी या कांद्याच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव सरासरी 1000 रुपयांच्या आत आल्याने शेतकरी चिंतेत आहे. 

निर्यातबंदीचा फटका 

केंद्र सरकारने निर्यात खुली केल्यानंतर आठवडाभरात कोरोनाचे संकट आल्याने निर्यातबंदीचा फटका कांद्याच्या दराला बसला आहे. त्यामुळे निर्यात सुरू होऊन कांद्याला योग्य भाव मिळत नाही, तोवर कांदा विक्री करायची नाही, असा निर्णय खटाव, माण तालुक्‍यांतील बहुतांशी शेतकऱ्यांनी घेतला असून, कांदा ऐरणीत साठवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. कांदाचाळी नसणारे शेतकरी ज्वारीचा कडबा, उसाची पाचट व प्लॅस्टिक कागदाचा वापर करून ऐरणी तयार करीत आहेत.

Lockdown2 : मटण, चिकन हवंय येथे फाेन करा

कोरोनानंतर पश्‍चिम महाराष्ट्रापुढे हे असेल संभाव्य संकट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT