कऱ्हाड ः फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू झालेला पेंटिंगचा व्यवसाय मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालतो. मात्र, यंदा तो सगळा कालावधी लॉकडाउनमध्ये गेला. त्यामुळे पेंटिंगशी संबंधित जिल्ह्यातील 300 व्यावसायिकांच्या पेन्टस् व्यवसायाची तीन महिन्यांची तब्बल 240 कोटींची उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्या व्यवसायावर अवलंबून असणारे सुमारे 15 हजार पेंटर बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने बांधकाम व्यावसायिकांप्रमाणेच पेंटरांनाही काहीतरी आर्थिक मदत करण्याची गरज आहे अशी अपेक्षा पेन्टस् व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
कोकणाला जोडणारा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्यात पेन्टस् व्यवसाय मोठा आहे. जिल्ह्यात सुमारे 300 पेन्टसची मोठी शोरूम आहेत. खेड्यापाड्यातही छोटी मोठी दुकाने आहेत. त्या व्यवसायावर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या ठेकेदार पेंटरची संख्या तीन हजार, तर त्यांच्यांतर्गत 15 हजार पेंटर सध्या कार्यरत आहेत. लॉकडाउननंतरच्या कालावधीत व्यवसायाची कोट्यवधींचा हानी झाली आहे. जिल्ह्यात सर्वच दुकानांचा व्यवसाय हा महिन्याकाठी तब्बल 80 कोटींच्या आसपास जातो. त्यात ब्रॅंडेड सात कंपन्या तब्बल 58 कोटींचा व्यवसाय करतात. लोकल पेन्टस् कंपन्या तब्बल 20 लाखांचा व्यवसाय करतात. सरासरी व्यवसाय 80 कोटींच्या आसपास जातो. जो व्यवसाय सध्या पूर्णपणे बंद आहे. वास्तविक मार्च ते मे अखेरपर्यंत या व्यवसायाला गती असते. वर्षातील सर्वात मोठी उलाढाल या तीन महिन्यांत होते. कोरोनामुळे व्यवसायाची मोठी हानी झाली आहे. मार्च तर हातून गेला आहे. एप्रिलमध्ये व्यवसायाची काहीही संधी नाही. काही संधी मे महिन्यामध्ये मिळेल, अशी अपेक्षा व्यावसायिकांना नाही. त्यामुळे तीन महिन्यांत वर्षातील उलाढालीची सरासरी गाठणारा व्यवसाय ठप्प झाला आहे. व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कंपन्यांची देणी बाकी आहेत. बाजारात माल खरेदीला कोणी नाही. अशी त्यांची अवस्था आहे.
पेंटिंगच्या व्यवसायवर जगणाऱ्या पेंटरची संख्या जवळपास 15 हजार आहे. त्यांची अवस्था फार वाईट झाली आहे. पेंटर पूर्णपणे बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. ते ज्या ठेकेदारांकडे काम करतात. त्याचीही वाईट अवस्था झाली आहे. काही पेंटरनी व्यावसायिकांकडून उचल घेतली आहे. मात्र, त्या व्यावसायिकांनाही मदतीला मर्यादा आल्या आहेत. त्यांच्याही उलाढाली ठप्प आहेत. त्यामुळे पेंटरची अवस्था बिकट झाली आहे. 15 हजार कुटुंबांत प्रत्येकी जवळपास पाच व्यक्ती गृहीत धरल्या तरी जवळपास 75 हजार नागरिकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. पेंटिंगच्या व्यवसायात नवीन व जुने पेंटिंग अशा दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. नवी कामे अजिबात नाहीत, तर जुन्या व्यवसायाच्या संधी आहेत. मात्र, त्यांना लागणाऱ्या रंगासाठी शोरूम खुली नाहीत, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने बांधकाम मजुरांनी काही रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. पेंटरही त्याच बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यांनाही त्या मजुरांप्रमाणे काहीतरी रक्कम देण्याची व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणी होत आहे.
ब्रॅंडेड कंपन्यांची उलाढाल मोठी
जिल्ह्यात ब्रॅंडेड कंपन्यांची मोठी उलाढाल होते. जिल्हा कोकणाला लागून आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातून रत्नागिरी, चिपळूण, संगमनेर भागामध्ये वेगवेगळ्या कन्ट्रक्शनला कऱ्हाडातून माल जातो. तीही उलाढाल ठप्प आहे. जिल्ह्यामध्ये आठ मोठ्या ब्रॅंडेड कंपन्याची उलाढाल होती. सरासरी एका कंपनीची महिन्याला पाच कोटींपासून 10, 15 ते 25 कोटींपर्यंत उलाढाल होते. काही लोकल कंपन्याही आहेत. त्या सगळ्याची एकत्रित उलाढाल 25 कोटींच्या आसपास आहे.
Video : देवा सारखी माणसे मला भेटली
खाल्ले तर सारेजण खाऊ...नाहीतर सगळेच उपाशी मरु
कऱ्हाडला दहा जणांसह ट्रकही ताब्यात
""पेन्टसचा व्यवसाय अत्यंत जिकिरीचा व्यवसाय आहे. वर्षभरात मार्च ते मे अखेरपर्यंत पेंटिंगचा व्यवसाय होतो. वर्षभराची सरासरी व्यवसाय गाठण्याची संधी याच कालावधीत असते. मात्र, यंदा कोरोनामुळे महिन्याला जिल्ह्याचे तब्बल 80 कोटींच्या आसपास नुकसान झाले आहे. त्याचबरोबर या व्यवसायावर अवलंबून असलेल्या पेंटर व्यावसायिकांवरही अत्यंत वाईट वेळ आली आहे. पेंटरना बांधकाम व्यावसायिकांच्या यादीत घेऊन शासनाने त्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. अन्यथा पाऊणलाख लोकांवर उपाशी मरण्याची वेळे येईल.''
- इरफान सय्यद, पेन्टस् व्यावसायिक, कऱ्हाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.