कलेढोण (जि.सातारा) : लॉकडाउनमुळे आईपासून दुरावलेली मुले आज सकाळी दहा वाजता आईच्या कुशीत विसावली. सकाळपासून सूरज, जयवंती व ऋतुजा हे आईबाबांची दाराच्या पायरीवर बसून वाट बघत होती. गाडीतून खाली उतरताच आई सुलोचना व बाबा सखाराम यांना रडू कोसळलेच; पण लहानग्यांच्या डोळ्यात अश्रू तरळताना पाहताच उपस्थितांची मनेही गहिवरली.
आई- मुलांच्या भेटीसाठी "सकाळ' माध्यम समूहाच्या विविध फ्लॅटफाॅर्मवर वृत्त प्रसिद्ध करताच मायणीचे पोलिस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी पोलिसांच्या मदतीने कुटुंबीयांना वाहन परवाना मिळवून दिला. त्यामुळे सखाराम कामडी व पत्नी सुलोचना हे विखळे (ता. खटाव) येथे पोचल्याने सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. विखळे येथे सात वर्षांपासून सखाराम कामडी (मूळ गाव- मु. हातगड, पो. देसगाव, ता. तळवण, नाशिक) हे पत्नी सुलोचनालासोबत वाट्याने शेती करतात. लॉकडाउनपूर्वी सुलोचना यांच्या आई आजारी पडल्याने तिला त्या पातळी (पो. भोरबाळ, ता. सुरगाणा, नाशिक) येथे पतीला घेऊन ता. 20 मार्चला गेल्या. प्रवास दूरचा असल्याने पहिलीतील सूरज, तिसरीतील जयवंती व चौथीतील ऋतुजाला अंगणवाडी सेविका सुप्रिया देशमुख यांच्याकडे सोडले.
याचकाळात ता. 22 मार्चपासून राज्यात लॉकडाउन झाल्याने पिलांपासून दुरावलेली आई पुन्हा माघारी येणार तेवढ्यात... (आई मुलांपासून दुरावली) याबाबत "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या बातमीची दखल पोलिस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी नाशिक शाखेतील पोलिस उपनिरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याशी संपर्क करीत सखाराम कामडी कुटुंबीयांना वाहन परवाना मिळवून दिल्याने कामडी कुटुंबीय विखळेत आज दाखल झाले. प्रवासाच्या परवान्यानंतर शुक्रवार (ता. 17) रात्री 11 वाजता हे कुटुंबीय गावाहून निघून सकाळी दहा वाजता पोचले. सकाळपासून आई- बाबा येणार म्हणून सूरज, जयवंती व ऋतुजा हे दाराच्या पायरीवर बसून वाट बघत होते. गाडीतून खाली उतरताच सुलोचना व सखाराम यांना चिमुकल्यांना पाहून रडू कोसळले, तर लहानग्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. हे पाहताच उपस्थितांची मनेही गहिवरली. सखाराम कामडी यांनी पोलिस पाटील भरत देशमुख, उपनिरीक्षक शहाजी गोसावी व पत्रकारांचे आभारही मानले. याच वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रवीण देशमुखे यांनी कामडी कुटुंबीयांना होम क्वारंटाइन करून सुरक्षित राहण्याबाबत सल्ला दिला. ग्रामस्थ व कामडी कुटुंबीयांनी "सकाळ'चे आभार मानले.
Video : त्यांना इश्काचा गुलकंद पडला महागात
रेशनिंग आणायला जाता ? मग आधी हे वाचा...
Video : त्यांच्या उर्जेमुळेच मी आज कोरोनामुक्त
Lockdown : निर्यातक्षम द्राक्षे बागांमध्ये पडून; शेतकऱ्यांपुढे अर्थिक संकट
मुलांना भेटण्यासाठी गावाकडे कुणीही मदत केली नाही. मात्र, विखळेतील ग्रामस्थ, पोलिस, पोलिस पाटील, पत्रकार बांधवामुळे आम्ही मुलांपर्यंत सुखरूप पोचलो. त्यांच्या प्रयत्नामुळे आम्ही मुलांना भेटू शकलो. नाहीतर कधी भेट होईल, माहीत नव्हते.
- सखाराम कामडी, मुलांचे वडील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.