लोणंद : लोणंद येथील सुंदरनगर समोरच्या ऋषीनंदन डेव्हलपर्स,गांधी -ननावरे कॉर्नर या इमारतीतील १३ वर्षाची मुलगी नुकतीच सातारा येथून शासकीय रुग्णालयातून कोरोना मुक्त होवून घरी परतली. ज्या दिवशी तिची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, योगायोगाने नेमका त्याच दिवशी तिचा वाढदिवसही होता. वय किती असा प्रश्न अधिकाऱ्यांनी विचारला तेव्हा आजच तिला १३ वर्षे पूर्ण होत आहेत. आजच तिच्या वाढदिवस असल्याचे घरातील लोकांनी सांगितले. त्यावेळी उपस्थीत सर्वजण काहीवेळ स्तब्द झाले. त्याचवेळी लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष चौधरी यांनी त्या मुलीला शब्द दिला, की तू घरी परत आल्यावर तुझा वाढदिवस केक कापून दणक्यात साजरा करू.
त्यानुसार ती रुग्णालयातून बरी होवून हसतमुखाने आपल्या लोणंद येथील घरी परतली. त्यावेळी त्या इमारतीतील शेजाऱ्यांनी व नागरीकांनी फुले उधळत तिचे स्वागत केले. तसेच लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष चौधरी, खंडाळ्याचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले,रोहित निंबाळकर, पोलिस हावलदार फैय्याज शेख,अविनाश शिंदे आदींनी तिच्या घरी जावून तिचा वाढदिवस केक कापून उत्सहात साजरा केला. त्यावेळी तीचे आई वडिल लहान भाऊ बहिण व नातेवाईक उपस्थित होते. तिला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देताना एका मोठ्या आजाराच्या संकटावर तिने धैर्याने मात करुन यशस्वी लढाई जिंकल्याबद्दलही उपस्थीत सर्वांनी तिचे अभिनंदनही केले.
गुजरातने पाठविला...कर्नाटकने नाकारला...महाराष्ट्राने स्विकारला
गावाकडंची माती...
पहा शैक्षणिक क्षेत्रातील अभिनव प्रयोग
सातारा जिल्ह्यात काेविड 19 बांधितांची संख्या वाढतच आहे. यामध्ये लहान मुले काेराेनाबाधित हाेत असल्याने आगामी काळात त्यांची काळजी घेणे आवश्यक बनले आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.