पश्चिम महाराष्ट्र

कर्जवसुलीसाठी बॅंकखाती सील; अनेकांच्या हाती पगाराचा भाेपळा

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनच्या काळात समाजातील सर्व घटकांच्या गैरसोयी लक्षात घेऊन सरकार व प्रशासन त्यावर उपाययोजना करत आहे. रिझर्व्ह बॅंकेनेही कर्जदारांच्या अडचणी लक्षात घेऊन तीन हप्त्यांच्या वसुलीला स्थगिती आणि त्यावरील व्याज माफ करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु, जे शिक्षक वा अन्य नोकर कर्जदार, जामिनदार यांची खाती बॅंकांनी कर्जवसुलीपोटी सील केली आहेत. त्यांच्यावर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. 

कोरोनाच्या महासंकटाशी सर्वजण लढत आहेत. त्यात महाराष्ट्रातून आरोग्य, महसूल, पोलिस व इतर प्रशासकीय कर्मचारी लोकांच्या मदतीला धावून जात आहेत. सरकार व प्रशासन समाजातील अखेरच्या घटकांपर्यंतची काळजी घेताना दिसत आहे. हक्काचे घर नसणाऱ्या वा शहरात भाडेतत्त्वावर राहणाऱ्या भाडेकरूंकडून तीन महिने भाडेवसुली करू नये. बॅंकांनी कर्जदारांचे हप्ते तीन महिने स्थगित ठेवावेत, अशा अनेक उपाययोजना होत आहेत. सध्याच्या बिकट स्थितीत या उपाययोजना सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या आहेत. परंतु, काही खासगी बॅंका, पतसंस्था, पतपेढ्या यांनी 31 मार्च 2020 या आर्थिक वर्षाची वसुली करताना नोकर कर्जदार, जामिनदारांची बॅंकेतील खाती (ज्या बॅंकांत पगार जमा होतात त्यांसह) वसुलीसाठी सील केली आहेत. 
त्यामुळे त्यांना कोणत्याच बॅंकांतील खात्यांवरून व्यवहार करणे अशक्‍य झाले आहे. सध्या सरकारही शिक्षकांसह अन्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार करण्याच्या सक्षम स्थितीत 
नसताना, होणारे पगारही 30 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंतच्या कपातीने जमा होणार आहेत. अशा दुहेरी संकटाचा सामना कर्जदार आणि जामिनदार यांना करावा लागणार आहे. 
अगोदरच प्रलंबित असलेले पगार आता जमा होऊनही त्याचा काही एक उपयोग संबंधितांना होणार नाही. त्यामुळे त्या पगारावर अवलंबून असणारी सर्व कुटुंबेही उपासमारीच्या चक्रात अडकणार आहेत. लॉकडाउननंतर कर्ज भरण्यासाठी वेळ व मुदत देऊन मार्ग काढताही येऊ शकेल. परंतु, सध्याची प्रतिकूल स्थिती पाहता, सरकारने बॅंकांना कोणत्याही कर्जदारास वसुलीसाठी सक्ती करणे म्हणजे सावकारीचेच दुसरे रूप असल्याची भावना कर्जदार व जामिनदारांतून व्यक्त होत आहे. 


""मार्च 2020 च्या माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि इतर शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची "सीएमपी' झाली असून, धनादेश लवकरच बॅंकेत जमा करण्यात येणार आहे. शाळांनी संबंधित पत्रानुसार वेतनदेयके बॅंकेत जमा करून वेतनाच्या रकमा कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा वर्ग करून घ्याव्यात.'' 

-अनिल बनसोडे, अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) शिक्षण विभाग), सातारा 

राज्य शासनाच्या एक एप्रिलच्या अध्यादेशानुसार मार्च व एप्रिल 2020 चे प्रदान करण्यात येणारे वेतन दोन टप्प्यात अदा करण्याचा निर्णय झाला आहे. परंतु, मार्च पेड इन एप्रिलचे वेतन अद्याप झालेले नाही. त्यातील निम्मे वेतन येत्या दोन ते चार दिवसांत होण्याची शक्‍यता आहे. मात्र, बॅंकांनी सील केलेल्या खात्यांमुळे संबंधित शिक्षक, अन्य नोकर कर्जदार व जामिनदारांची अवस्था असून अडचण व नसून खोळंबा, अशी होणार आहे. यावर सरकारने खासगी बॅंका, पतसंस्थांना स्वतंत्रपणे खाती सील न करण्याचे व केलेली खाती पुन्हा सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी कर्जदारांतून होत आहे.

सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांसाठी महत्वाची बातमी

अटकेपुर्वीच वाधवानांच्या सुटकेचे रंगलंय राजकारण

BigBreaking : पाच महिन्याच्या बाळाचा मृत्यू तर तीन वर्षाच्या मुलास कोरोना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT