सातारा : पुणे- मुंबईतून आपापल्या गावी जाण्यासाठी लाखोंच्या संख्येने नोंद झाली आहे. प्रशासनाने लालपरीने मोफत घरी सोडण्याची जय्यत तयारी केली आहे. एकट्या सातारा जिल्ह्यात दोन लाख लोक घरवापसी करीत आहेत. मात्र, सरसकट हे लोक येण्याने येथील आरोग्य बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी सर्वांचे स्वॅब तपासणी करूनच प्रवेश द्यावेत, अशी मागणी ग्रामीण भागात जोर धरत आहे.
ताप, सर्दी, खोकला व घशातील खवखव अशी लक्षणे नसणाऱ्या मुंबई- पुण्यातील व्यक्ती आता आपापल्या घरोघरी परतणार आहेत. मात्र, मुंबई, पुणे ही दोन्ही ठिकाणे सध्या कोरोना हॉटस्पॉट बनली आहेत. अशात लाखोंच्या संख्येने येथून बाहेर पडणारे लोक ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत, तेथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार 70 टक्के रुग्णांना लक्षणे आढळून येत नाहीत. अशात वरवरची तपासणी करून येणारे हे स्थलांतरित कोरोनाचे प्रसारक ठरणार नाहीत हे कशावरून? येणाऱ्या लोकांना होम क्वारंटाइन करण्यासाठी त्यातील किती जणांच्या घरी स्वतंत्र खोल्या आहेत आणि क्वारंटाइनचे नियम पाळले जाणार का? त्या घरातील लोकांचा संपर्क संबंधित व्यक्तीशी येतो व घरातील इतर सदस्य गावातील लोकांशी संपर्कात येतात. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
येणाऱ्या व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करणे उचित ठरणार आहे. येणाऱ्या लोकांची गावातील कोरोना समितीला शाळा, समाजमंदिर आदींमध्ये व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या पाहिजेत अथवा समिती व गावाने स्वतःहून ठरवले पाहिजे. अन्यथा गावेच्या गावे बाधित होण्याचा धोका उद्भवू शकतो. तो टाळण्यासाठी येणाऱ्या लोकांची स्वॅब तपासणी करावी. त्याचे अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे. अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्यांना होम क्वारंटाइनमध्ये पाठवावे, अशी मागणी होत आहे.
मोठ्या संख्येने लोक तालुक्यात येणार आहेत. सर्वांची स्वॅब तपासणी शक्य नाही. शासनाच्या नियमानुसार सर्वांना होम क्वारंटाइन करून त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.
-समीर यादव, तहसीलदार, पाटण.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.