सातारा : सातारा शहरात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांनी हिरकणी फाउंडेशनच्या माध्यमातून उत्साहात शिवजयंती साजरी केली. सामाजिक प्रबोधनाचा भाग म्हणून आज शिवजयंतीदिनी फाउंडेशनच्या महिलांतर्फे शिवजयंती वॉकथॉनचे आयोजन केले हाेते. यामध्ये सर्वच महिला रंपारिक वेशभुषा तसेच नऊवारी परिधान करुन वॉकथॉनमध्ये सहभागी झाल्या हाेत्या. महिलांवरील वाढते अत्याचार थांबवले जावेत आणि त्यांना मानसन्मानाची वागणूक मिळावी, अशी या शिवजयंती वॉकथॉनची संकल्पना आहे.
सातारा जिल्हा शिवछत्रपतींची भूमी आणि मराठा स्वराज्याची राजधानी आहे. त्यामुळे दर वर्षी जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते. त्यात प्रामुख्याने पुरुष आणि तरुणाईचाच सहभाग राहिला आहे. यंदा मात्र आता महिलांनीही एकत्र येत शिवजयंती आणि शिवजयंती वॉकथॉनचे आयोजन केले हाेते. छत्रपती शिवरायांच्या काळात मातृसत्ताक पद्धत होती. तीच परंपरा आणि तिचा आदर यापुढेही व्हावा, असे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले.
सकाळी सातच्या सुमारास शेकडाे महिला गांधी मैदानावर जमल्या. तेथे शिवज्याेत पेटविण्यात आली. ढाेल तांशाच्या गजरात वॉकथॉनला प्रारंभ झाला. डाेक्यावर फेटा, हातात भगवे झेंडे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी...जय शिवाजी....भारतमाता की जय असा जयघाेषात करीत महिला वॉकथॉनमध्ये सहभागी झाल्या. माेती चाैक, सदाशिव पेठ, पाेलिस मुख्यालय, पाेवई नाका येथे सर्वजण पाेहचले. घाेड्यावरील बालमावळ्यांनी नागरीकांचे लक्ष वेधून घेतले.
जरुर वाचा : शिवेंद्रसिंहराजे सुखरुप; पुढील उपचारार्थ मुंबईला रवाना
पाेवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिवजयंती वॉकथॉनचा समाराेप झाला. या शिवजयंती वॉकथॉनच्या नियोजनाची जबाबदारी जयश्री शेलार, अपर्णा शिंगटे, डॉ. रूपाली देशमुख, डॉ. शुभांगी गायकवाड, संचिता तरडे, नीलम चव्हाण, पुष्पा सकुंडे, वाणीश्री दास, दिशा पुरस्वामी, तेजश्री यादव, मधुरा नलवडे, स्मिता पाटील, तेजश्री जाधव, शीतल आहेरराव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी यशस्वीरित्या पेलली.
दरम्यान सातारा शहर आणि परिसरात शिवजयंती उत्सव माेठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणहून शिवज्याेत आणल्या जात आहेत. जय भवानी जय शिवाजीचा अखंड गजर करीत युवा वर्ग ज्याेत घेऊन पाेवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत आहेत....भारतमाता की जय या जयघाेषात विविध किल्ल्यावरुन आणलेल्या शिवज्याेती मंडळांपूढे ठेवण्यात येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.