पश्चिम महाराष्ट्र

Video : फॅन्टास्टिक; बाळाने आणि आज्जीने धुडकाविले त्याला

हेमंत पवार

कऱ्हाड : वय अवघ दहा महिने. मुंबईवरुन घरापर्यंतचा प्रवास झालेला. घरी आल्यानंतर तीनच दिवसात बाळाला अचानक श्वसनाचा त्रास सुरु झाला. त्यानंतर त्याची तपासणी केल्यावर कोरोनाचे निदान झाले. त्यामुळे सारेच हादरुन गेले. बाळाच्या आईसह नातेवाईकांचीही तपासणी करण्यात आली. ती निगेटीव्ह आल्याने कुटुंबाचा धोका टळला मात्र बाळाचा धोका कायम होता. पोटचा गोळा काचेत असल्याने आई-वडीलांसह साऱ्यांच्याच जीवाची घालमेल सुरु होती. कृष्णा हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी शर्थीच्या प्रयत्नांनी उपचार करुन ते बाळ आज ठणठणीत केले. तब्बल 14 दिवसांच्या उपचारानंतर बाळाला आज (बुधवार) घरी सोडण्यात आले. हॉस्पीटल सोडताना आईसह नातेवाईकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. मात्र बाळ कोरोनामुक्त झाल्याने डेरवणकरांत आनंदाचे वातावरण होते.

चाफळ विभागातील डेरवण येथील संबंधित चिमुकल्याचे कुटूंब मुंबईला माणखुर्द येथे स्थायिक आहे. त्याचे वडील तेथे नोकरी करतात. सारे कुटूंब 22 मार्चला गावी आले होत. त्यादिवशी ते कुटूंब पहिल्यांदा माहेरी जाळगेवाडी येथे गेले. तेथे काही दिवस राहिल्यानंतर ते सारे डेरवणला गेले. तेथे गेल्यानंतर त्या चिमुकल्याला श्वसनाचा त्रास होवू लागला. त्यामुळे त्याला कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पीटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची दोनवेळा कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याने डेरवणसह पाटण तालुक्यात खळबळ उडाली होती. त्याला बाधा झाल्याने पोलिस व आरोग्य विभागाने डेरवणसह, भैरेवाडी, मधलीवाडी, बोरगेवाडी, वाघजाईवाडी, शिंगणवाडी दाढोली आणि त्या चिमुकल्याच्या आजोळी जाळगेवाडी पाच किलोमीटरचा परिसर सील केला आहे. त्याचबरोबर त्याच्या संपर्कातील तब्बल 30 जणांचीही तपासणी केली होती. त्या बाळाच्या आई-वडीलांसह संबंधित सहवासीतांचे रिपोर्ट निगेटीव्ही आले. त्यामुळे त्यांचे संकट टळले तरी बाळाचे मात्र कायमच होते. संबंधित बाळाचे वय कमी असल्याने आणि कोरोनासारख्या गंभीर आजाराने त्याला घेरल्याने त्यातुन त्याला बाहेर काढण्यासाठी कृष्णा हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी त्यांच्या प्रयत्नांची शर्थ करत होते. त्यादरम्यान मात्र संबंधित बाळाच्या कुटुंबीयांची घालमेल सुरु होती. बाळ काचेत आणि नातेवाईक बाहेर अशी स्थिती होती. त्यामुळे नातेवाईकांचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरच देव म्हणुन भरोसा होता. त्यांनीही आपल्या परीने शक्य तितके इफर्ट घेवुन अखेर 14 व्या दिवशी त्या बाळाला ठणठणीत केले. त्यामुळे हॉस्पीटल प्रशासनान त्या बाळाला आई-वडिल व कुटुंबीयांच्या आज ताब्यात देवुन घरी सोडण्यात आले. त्यामुळे नातेवाईकांची जीव भांड्यात पडला. प्राताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, मेडीकल डायरेक्टर डॉ. क्षीरसागर यांच्या उपस्थितीत संबंधितांना हॉस्पीटलमधुन निरोप देण्यात आला. त्याला घरी सोडताना आईसह नातेवाईकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. मात्र बाळ बरे झाल्यामुळे चाफळ-डेरवणकरांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

73 वर्षांची आज्जी, रेल्वे कर्मचारीही घरी

कऱ्हाड तालुक्यात म्हारुगडेवाडीतील पहिल्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यु झाला. त्यामुळे संबंधितांची आई कोरोना बाधीत झाली. त्यांचे वय जास्त असल्याने डॉक्टरांपुढे त्यांच्यावरील उपचाराचे आव्हानच होते. मात्र तरीही त्यांनी मोठे प्रयत्न करुन त्या आज्जीलाही उपचारावर कोरोनाच्या विळख्यातुन बाहेर काढले. त्याचदरम्यान हजारमाची-ओगलेवाडीतील एक रेल्वेचा कर्मचारी बाधीत झाला. तो तरुण असल्याने तो बरा होईल याची खात्री होती. त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु होते. आज कोरोनात मुलगा गमावलेल्या 73 वर्षांच्या आज्जी आणि रेल्वे कर्मचारी कोरोनामुक्त झाले. त्यांनाही आज कृष्णा रुग्णालयातुन टाळ्यांच्या गजरात घरी सोडण्यात आले.

उभ्या आयुष्यात बहिणीला असं रडताना पाहिलं नव्हतं...

गुड न्यूज : सातारा जिल्ह्यात तिघे कोरोनामुक्त; आज घरी परतणार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

SCROLL FOR NEXT